---Advertisement---

VIDEO। ‘आलिशान व्हिला, चमचमता स्विमिंग पूल’ हार्दिक पंड्याची लग्जरी लाईफस्टाईल पाहिलीत का?

On: शनिवार, ऑगस्ट 20, 2022 4:20 PM
Hardik-Pandya-Greece
---Advertisement---

टीम इंडियाचा स्टार हार्दिक पंड्या नेहमीच एक आलिशान आयुष्य जगतो. आशिया चषकापूर्वी अष्टपैलू खेळाडू ताजातवाना राहावा यासाठी त्याला झिम्बाब्वे मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. पंड्याने या सुट्ट्या कुटुंबासोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला. तो सध्या ग्रीस आणि सॅंटोरिनी बेटाला भेट देत आहे. हार्दिक आणि नताशाने इथून काही फोटो शेअर केले आहेत.

हार्दिक पांड्याने त्याच्या इंस्याग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. जिथे तो स्विमिंग पूलच्या बाजूला नाईट सूट घालून एका आलिशान व्हिलामध्ये उभा दिसतो. भारतीय अष्टपैलू खेळाडूची शैली राजापेक्षा कमी दिसत नाही. व्हिडिओला लाखो व्ह्यूज, हजारो लाईक्स आणि अगणित कमेंट्स मिळाल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/ChcHIWsJ5b2/?utm_source=ig_web_copy_link

याआधीही त्याने सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. कधी तो समुद्राच्या लाटांमध्ये मस्ती करताना दिसतो तर कधी पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्यसोबत एन्जॉय करताना दिसतो. अगस्त्य ३० जुलै रोजी दोन वर्षांचे झाला आहे. हार्दिक आणि नताशा आपल्या मुलाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत आहेत याचे हे देखील एक कारण आहे.

https://www.instagram.com/p/ChZcoVpL0XM/?utm_source=ig_web_copy_link

हार्दिक पांड्याची पत्नी सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ती सतत सोशल मीडियावर असते आणि व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. नताशाच्या लूकचे करोडो चाहते आहेत, जे तिच्या पोस्टवर कमेंटही करतात. त्यामुळेच हे दोघेही पती पत्नी सोशल मिडीयावर अनेकवेळा ऍक्टिव्ह असल्याने ते आपली जीवनशैली चाहत्यांसमोर उलघडत असतात आणि चाहतेही त्यांच्या या पोस्ट्सला भरभरून प्रतिसाद देत प्रेम देत असतात.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

क्षणात तोडलं हृदय! इंग्लंडचा शतकवीर दुर्देवीरित्या धावबाद, संघ सहकाऱ्यानेच उडवल्या दांड्या

सोलापूर ते नागालँड अन् थेट टीम इंडिया असा प्रवास करणाऱ्या किरणची रोमहर्षक कहाणी, एकदा वाचाच

२८१ सामने खेळलेल्या भारतीय क्रिकेटरचा क्रिकेटला अलविदा! सप्टेंबर महिन्यात खेळणार शेवटचा सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---