भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारपासून (17 डिसेंबर) कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना ऍडलेड मैदानावर खेळला जात आहे. बीसीसीआयने एक दिवस आधीच पहिल्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली. कर्णधार विराट कोहलीने पहिल्या सामन्यात शुबमन गिल किंवा रिषभ पंत या दोघांना ही प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नाही. ज्यामुळे सोशल मीडियावर लोकांनी विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने विराट कोहली आपल्या नेतृत्त्वामध्ये कोठे सुधारणा करू शकतो, हे सांगितले आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटले की, विराट कोहली आपल्या संघासाठी आदर्श आहे आणि प्रेरणा देणारा स्रोत आहे म्हणणे चुकीचे नाही ठरणार. कोहली आपले क्षेत्ररक्षण लावताना थोडा बचावात्मक आहे. मात्र, त्याच्या व्यतिरिक्त संघात सातत्याने बदल करतो. तो आपल्या कामाप्रति समर्पित राहणार्या कर्णधारा पैकी एक आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात बोलताना लक्ष्मण म्हणाला, “मी पहिले ही म्हणालो आहे की, कोहली जेव्हा ही मैदानावर असतो, तेव्हा तो खेळात बुडून जातो आणि याची माहिती फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना त्याच्या चेहऱ्यावर येणार्या हावभावामधून दिसून येते. तो एक उदाहरण बनून संघाची कमान सांभाळतो आणि खेळाडूंवर याचा सकारात्मक परिणाम पाहिला मिळतो.”
परंतु लक्ष्मणचे आहे की यांच्याव्यतिरिक्त विराट कोहली आपल्या नेतृत्त्वात काही सुधारणा करू शकतो. ज्याची त्याला गरज आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला, “विराट कोहलीने संघाचे नेतृत्त्व स्विकारल्यापासून सातत्याने प्रयोग केले आहेत. ज्यामुळे खेळाडूंमध्ये संघातील आपल्या जागेबद्दल असुरक्षित वाटते. मी माझ्या अनुभवातून सांगू शकतो खेळाडू नवा असो किंवा अनुभवी त्याला संघात सुरक्षिततेची भावना पाहिजे असते. ज्यामुळे तो संघासाठी उत्तम प्रदर्शन करण्यावर लक्ष देऊ शकतो. विराटला या क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे. या शिवाय विराटने क्षेत्ररक्षण लावताना सुधारणा करायला पाहिजे. कारण की मला वाटते तो मैदानावर नेहमी बचावात्मक क्षेत्ररक्षण लावण्यावरती थोडा भर देतो.”
परंतु विराट कोहलीने 2014 साली कसोटी संघाचे नेतृत्त्व स्विकारले होते, तर 2017 मध्ये मर्यादित षटकांचे प्रतिनिधित्व स्वीकारले. विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने मागील ऑस्ट्रेलिया दौर्यात 2-1 ने विजय मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या माजी खेळाडूचे क्रिकेटमध्ये पुनरागमन; मुंबई संघाच्या निवडसमिती प्रमुखपदी झाली निवड
…म्हणून गिल नाही, तर शॉची केली प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड; कर्णधार कोहलीने सांगितले कारण






