भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिका शुक्रवारी (27 जानेवारी) सुरू होईल. मालिकेतील पहिला सामना एमएस धोनी याचे होम ग्राउंड झारखंड स्टेट क्रिकेट असोसएशन मैदानावर (JSCA International Stadium) खेळला जाणार आहे. सामना रात्री 7.30 मिनिटांनी सुरू होणार असून खेळपट्टी महत्वाची भूमिका पार पाडेल. हार्दिक पंड्या याला या टी-20 मालिकेतन संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. अशात पहिला सामना जिंकवून हार्दिक मालिकेची सुरुवात गोड करण्याच्या प्रयत्नात असेल.
पाहुण्या न्यूझीलंड संघाला भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप दिला. पण टी-20 मालिकेत न्यूझीलंडचे आव्हान संघासाठी सोपे नसेस. टी-20 मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे वरिष्ठ खेळाडून खेळत नसल्यामुळे संघ युवा खेळाडूंनी भरला आहे. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार आहे. कर्णधाराच्या रूपात हार्दिक पंड्याची कामगिरी चांगली राहिली असली, तरी न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाला मात देणे सोपे नसेल. अशात भारतीय संघाला रांचीमधील केळपट्टीचा इतिहास आणि आकडेवारी लक्षात घेऊन नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घ्यावा लागेल.
कशी आहे रांचीची खेळपट्टी-
रांचीतील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर राहिली आहे. याठिकाणी चेंडूला चांगली ग्रिप मिळते आणि चेंडू टर्न देखील होतो. याचीमध्ये टी-20 सामना खेळताना प्रथम फलंदाजी करणारा संघ सरासरी 160 धावा करू शकला आहे. तर दुसऱ्या इनिंगची सरासरी मात्र 110 धावांच्या जवळपास राहिली आहे. रांचीमध्ये यापूर्वी आयपीएल सामने मोठ्या प्रमाणात खेळले गेले आहेत, पण आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांचा विचार केला, तर याठिकाणी फक्त तीन सामने खेळले गेले आहेत. या आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची निराशा झाल्याचे पाहायला मिळाले. तीन पैकी दोन सामन्यांमध्ये दुसऱ्या इंनिंगमध्ये फलंदाजी करणारा संघ विजयी झाला होता. तसेच मैदानात पडणारे दव देखील सामन्याच्या निकालावर परिणाम टाकू शकते, जे यापूर्वी रांचीमध्ये पाहायला मिळाले आहे. अशात भारतीय संघ या सामन्यात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ: शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), वाशिंगटन सुंदर, दीपक हुड्डा, उमरान मलिक, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह.
न्यूजीलैंड संघ: फिन एलन, डेवोन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चापमैन, ग्लेन फिलिप्स, डेरिल मिशेल, माइकल ब्रेसवेल, मिशेल सैंटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्यूसन, जॅकब डफी, हेनरी शिपले, ब्लेयर टिकनर. (Pitch prediction for the first T20 match between India and New Zealand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO | राहुलपाठोपाठ अक्षर पटेलही अडकला लग्नबंधनात, धुमधडाक्यात निघाली अष्टपैलूची वरात
बाबर आझमच्या आधी ‘या’ दिग्गजांनी जिंकलाय आयसीसी सर्वात मोठा पुरस्कार, पाहा 2004 पासून संपूर्ण यादी