विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाल्यापासून अनेक खेळाडू प्रतीक्रिया देत आहेत. कोणत्या खेळाडूची निवड व्हायला हवी होती आणि कोणाची निवड करू नये यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून श्रेयस अय्यर दुखापतीनंतर परतला होता पण त्याला मोठी धावसंख्या करता आली नाही. मात्र, जोपर्यंत अय्यर फलंदाजी करत होता तोपर्यंत तो आत्मविश्वासाने भरलेला दिसत होता. आता भारतीय संघाचा माजी फिरकीपटू पियूष चावलाने यावर प्रतीक्रिया दिली आहे.
पीयूष चावला (Piyush Chawala) स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला की, “आपण ईशान किशन आणि केएल राहुलबद्दल खूप बोलतोय पण श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) बद्दल का बोलत नाही. श्रेयस अय्यरच्या जागेचीही चौकशी व्हायला हवी. ईशान किशनने ज्या पद्धतीने वरच्या फळीमध्ये फलंदाजी केली आहे, ते पाहता तो राखीव संघात राहू शकत नाही.” असे तो म्हणाला आहे.
यापूर्वी दिनेश कार्तिकने श्रेयस अय्यरच्या पाकिस्तानविरुद्धच्या फलंदाजीवर आनंद व्यक्त केला होता. तो म्हणाला होता की, पाकिस्तानविरुद्ध श्रेयस अय्यरने खूप चांगली खेळी केली. येवढ्या दिवसांनी संघात परतून तो खूर चांगल्या लयमध्ये दिसत होता. मात्र, बाद झाला.
भारतीय संघातून बराच काळ बाहेर राहिलेल्या श्रेयस अय्यरची भारतीय संघात एंट्री झाली. भारतीय संघ आशिया चषकासाठी 4 क्रमांकाच्या फलंदाजाच्या शोधात असताना श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन झाले. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात श्रेयस सुरवातीला चांगल्या लयमध्ये दिसत होता. त्याने फलंदाजी करताना 9 चेंडूत 4 चौकार मारून 14 धावा केल्या. तो लवकर बाद झाला असला तरी तो चांगल्या लय मध्ये दिसत होता. असे अनेक खेळाडूंचे मत आहे.
यादरम्ययान भारतीय संघासाठी 5 नंबरवर पहिल्यांदाच खेळणाऱ्या ईशान किशनने चांगली फलंदाजी केला. त्याने 81 चेंडूत 82 धावा केल्या. सोबत असणाऱ्या हार्दिक पंड्यानेही चांगली फलंदाजी केली. तो 87 धावा करून बाद झाला. (piyush chawala talk about shreyas iyer)
महत्वाच्या बातम्या-
ICC ODI Rankings मध्ये भारताचा हुकमी एक्का शुबमनची हवा! पाकिस्तानी फलंदाजाला पछाडत पटकावला ‘हा’ क्रमांक
खळबळजनक! आशिया चषक सुरू असताना श्रीलंकन खेळाडूला अटक, केली मॅच फिक्सिंग