आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने सोमवारी (१९ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आपला २०० वा सामना खेळला. यामध्ये फिरकीपटू गोलंदाज पीयूष चावलाने एक कारनामा केला आहे.
चावला धोनीने खेळलेल्या आयपीएलमधील त्याच्या पहिल्या आणि २०० व्या सामन्याचा भाग ठरला आहे. असा कारनामा करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.
धोनीसोबत त्याच्या पहिल्या सामन्यात एकूण २१ खेळाडूंचा सहभाग होता. परंतु त्यातील २० खेळाडू आयपीएल २०२० मध्ये खेळू शकले नाहीत. त्यातील एकमेव खेळाडू पीयूष चावला होता. जो धोनीच्या पहिल्या आयपीएलच्या सामन्यात म्हणजेच २००८ मध्ये आणि २०२० मधील २०० व्या सामन्यात त्याच्यासोबत होता.
आयपीएलमध्ये धोनीने २०० सामने खेळताना ४१.४० च्या सरासरीने ४५९६ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने २३ अर्धशतकेही ठोकली आहेत.
राजस्थानविरुद्ध खेळलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने ५ विकेट्स गमावत १२५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने १७.३ षटकात ३ विकेट्स गमावत १२६ धावा करत विजय मिळवला. यासोबत त्यांनी २ गुण मिळवत गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली, तर चेन्नई संघाची आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-धोनीची निती वापरली धोनीलाच! संजू सॅमसनने असा केला धोनीचा गेम
-राजस्थानविरुद्धचा अटीतटीचा सामना धोनीसाठी ठरला खूपच खास, पाहा का ते
-‘२० सिट- अप्स करत असशील तर ३० कर’, माजी पाकिस्तानी दिग्गजाचा धोनीला मौल्यवान सल्ला
ट्रेंडिंग लेख-
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’