MS Dhoni : भारतीय क्रिकेटला सर्वाधिक काळ सेवा देणाऱ्या सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये पियुष चावला (Piyush Chawla) अव्वल स्थानावर आहे. लेग स्पिनरने 2012 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. परंतु त्यानंतर तो आयपीएलमध्ये सक्रिय आहे. त्याने 2023 आणि 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. नुकतेच एका मुलाखतीत बोलताना त्याने आता आपल्या निवृत्तीविषयी महत्त्वाचे विधान केले आहे.
35 वर्षीय चावला याने नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले. यामध्ये त्याला त्याच्या आणि एमएस धोनी याच्यामध्ये सर्वात आधी निवृत्त कोण होईल? असे विचारल्यानंतर त्याने एमएस धोनीचे नाव घेतले. तसेच आपल्याला पृथ्वी शॉ याने निवृत्त होण्याचा सल्ला दिला होता असे देखील त्याने सांगितले. त्यावर उत्तर देताना चावला म्हणाला होता की, मी सचिन पाजी आणि त्यांच्या मुलासोबत खेळलो आहे. आता तुझ्यासोबत खेळतोय आणि तुझ्या मुलासोबत खेळून निवृत्त होईल.
पीयूष चावला 2007 टी20 विश्वचषक आणि 2011 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने या दोन्ही ट्रॉफी जिंकल्या. चावलाने 2006 मध्ये मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 2012 टी20 विश्वचषकात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मागील बारा वर्षांपासून त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळालेली नाही.
याच मुलाखतीत बोलताना त्याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचे देखील कौतुक केले. रोहित केवळ एक कर्णधार नसून, एक नेता असल्याचे त्याने म्हटले. यासोबतच विराट कोहली याच्या खेळाची देखील त्याने प्रशंसा केली. चावला सध्या 35 वर्षांचा आहे. सध्या तो युपी टी20 लीगमध्ये खेळताना दिसतोय. आयपीएलच्या आगामी हंगामात देखील तो दिसण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रात्री अडीच वाजता मैसेज करुन रोहितने पियुष चावलाला खोलीत बोलवलं, मग पुढे काय घडलं?
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान आमनेसामने, कधी आणि कुठे पाहता येणार सामना? जाणून घ्या
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खैळाडू