Rohit Sharma : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे अनेक सहकारी खेळाडूंनी कौतुक केले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. तसेच वनडे विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास देखील केला होता. रोहितचे सहकारी खेळाडूंशी चांगले संबंध आहेत. नुकतेच अनुभवी क्रिकेटपटू पियुष चावलाने रोहितबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. रोहित संघासाठी कसा विचार करतो? हे चावलाने सांगितले.
रोहितबद्दल पियुष चावला म्हणाला की, तो कर्णधार नसून एक नेता आहे. एका मुलाखतीत बोलताना त्याने सांगितले की, “रात्री अडीच वाजता त्याने मला एकदा मेसेज केला, मला काहीतरी बोलायचे आहे, वर ये. तेव्हा एका कागदावर खेळपट्टी बनवून क्षेत्ररक्षण रचनेबद्दल तो माझ्याशी बोलला. ते वॉर्नरसाठी होते की इतर कोणासाठी हे आठवत नाही. जरा कल्पना करा, रात्री सुद्धा त्याच्या मनात काय चालले होते की, चावला गोलंदाजी करत असेल तर त्याच्यातील सर्वोत्तम कसे बाहेर काढायचे. ही खूप चांगली गोष्ट आहे.”
चावला पुढे म्हणाला, “ रोहित शर्मा हा कर्णधार नसून एक नेता आहे. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, त्यामुळे येणाऱ्या लोकांना ते सोपे जाते. त्याने सर्वकाही एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. मी त्याच्यासोबत खूप क्रिकेट खेळलो आहे. आम्ही फक्त मैदानावरच भेटत नाही तर मैदानाबाहेर किंवा टीम रूममध्ये चर्चा करतो.”
रोहित आणि पियुष चावला अनेक वर्ष एकत्र खेळले आहेत. हे दोन्ही खेळाडू मुंबई इंडियन्सकडून मागील काही वर्षांपासून खेळत आहेत. चावलाने आतापर्यंत आयपीएलमध्ये 192 सामने खेळले आहेत. या कालावधीत 192 विकेट्स घेतल्या आहेत. एका सामन्यात 17 धावांत 4 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. चावलाने भारताकडून 25 वनडे सामन्यांमध्ये 32 विकेट घेतल्या आहेत. तर 7 टी20 सामन्यात 4 विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान आमनेसामने, कधी आणि कुठे पाहता येणार सामना? जाणून घ्या
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खैळाडू
आयर्लंडच्या क्रिकेटपटूवर भारतात उपचार, पत्नीमुळे मिळालं दुसरं जीवन