टीम इंडियाचा स्टार विराट कोहलीबाबत काही दिग्गज क्रिकेटपटूंनी सांगितले की, तो काळासोबत बदलला आहे. युवराज सिंगने एका पॉडकास्टमध्ये सांगितले होते की, विराट कोहली आधी चिकू होता. आणि आता तो अजिबात चिकू नाहीये. तर अमित मिश्रा म्हणाला की, यश विराटच्या डोक्यात गेले होते. यश मिळाल्यानंतर विराट पूर्णपणे बदलला, पण टीम इंडियाचा माजी फिरकीपटू पियुष चावलाचे मत यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. पियुष चावलाची एक जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने गेल्या 10-15 वर्षांत विराटमध्ये काहीही बदल झाला नाही, हे सांगितले आहे.
जेव्हा पीयूष चावलाला 2 स्लॉगर्स या पॉडकास्टवर विचारण्यात आले, ‘विराट का बदलला आहे?’ या प्रश्नाचा उत्तर देताना पियुष चावला म्हणाला, पाहा मी विराटसोबत जेवढ्या वेळी भेटलो, जेवढ्या वेळी त्याच्या सोबत खेळलो आहे, तेव्हा माझा खूप चांगला अनुभव आहे. आम्ही एकत्र ज्युनियर क्रिकेट खेळलो आणि नंतर आयपीएल खेळलो, टीम इंडियासाठी एकत्र खेळलो. ही गोष्ट माझ्या बाबतीत आहे. बघा, प्रत्येकाची स्वतःची विचारसरणी असते.
– How can someone hate Virat Kohli 👑
– He is the gems of the person ❤️ @imVkohliVideo credit – @2Sloggers #ViratKohli pic.twitter.com/uHXoWj30lN
— 𝗝𝗲𝗲𝘁𝘂¹⁸. (@JeetXkohli) August 21, 2024
पियुष चावला पुढे म्हणाला, ‘जेव्हा विराट आशिया कपमध्ये (2023) खेळत होता, तेव्हा मी कॉमेंट्री करत होतो, मी बाऊंड्रीजवळ उभा होतो. एक शो इनिंगनंतर करायचा होता. ज्यावेळी विराट तिथे आला आणि म्हणाला, चल, काहीतरी छान ऑर्डर कर कारण आम्हा दोघांनाही खाययची आवड आहे. त्यामुळे आमच्यात 10-15 वर्षांपूर्वीचा संवाद होता तसचं आता आहे.
हेही वाचा-
5 चेंडू 5 षटकार, या गोलंदाजाची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर होती; पण कोहलीने आयुष्य बदलले
लेडी बुमराह! शाळेतल्या मुलीनं कॉपी केली जसप्रीत बुमराहची बॉलिंग ॲक्शन; VIDEO व्हायरल
एकेकाळी पैसे उधार घेऊन खेळायचा टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू! जाणून घ्या संघर्षमयी प्रवास