तब्बल दोन वर्षांनी होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाची लिलाव प्रक्रिया रविवार (२९ ऑगस्ट) पासून सुरु झाली आहे. ही लिलाव प्रक्रिया मंगळवार (३१ ऑगस्ट) पर्यंत चालणार आहे. या लीलावापूर्वी १२ संघांनी तब्बल ५९ खेळाडूंना संघात पुन्हा सामील (रिटेन) केले होते. तर १६१ खेळाडूंना लिलाव प्रक्रियेसाठी संघातून मुक्त करण्यात आले होते.
सोमवारी (३० ऑगस्ट) सर्वात प्रथम विदेशी खेळाडूंवर संघांनी आपली बोली लावली. लिलावाचा पहिला दिवस आणि दुसरा दिवस मिळून तब्बल ४० पैकी २२ विदेशी खेळाडूंवर यंदाच्या हंगामासाठी बोली लागली आहे. यामध्ये सर्वाधिक रुपयांची बोली इराणचा नवोदित खेळाडू मोहम्मदरेजा शदलोई चीयानेहवर लागली. ज्याला पटना पायरेट्स संघाने तब्बल ३१ लाखात संघात सामील केले.
त्यानंतर बंगाल वारियर्सने अबोजार मिघानीला ३०.५ लाख रुपये देऊन संघात सामील केले. या लिलावातला हा दुसरा सर्वाधिक महाग विदेशी खेळाडू ठरला.
या लिलावादरम्यान यु मुंबा, पटना पायरेट्स आणि बंगाल वारियर्स या संघांनी ३-३ खेळाडू आपल्या संघात सामील केले. पटना पायरेट्सने जेंग कुन लीला फायनल बीड मॅच कार्डचा (एफबीएम कार्ड) वापर करून पुन्हा एकदा आपल्या संघात सामील केले.
बोली लागलेले परदेशी खेळाडू –
मोहम्मदरेजा शादलो चियानेह – ३१ लाख – पटना पायरेट्स
अबोजार मिघानी – ३०.५ लाख – बंगाल वॉरियर्स
जेंग कून ली – २०.५ लाख – पटना पायरेट्स (एफबीएम कार्ड)
मोहसेन मघसौदलूजाफरी – १२.८० लाख – यु मुंबा
विक्टर ओबीएरो – १० लाख – पुणेरी पलटण
हामिद मिरजई नादेर – १२.१० लाख – हरियाणा स्टीलर्स
मोहम्मद मलक – १० लाख – दबंग दिल्ली
अबे टेटसुरो – १० लाख – तेलुगू टायटन्स
सोलेमन पहलेवानी – ११.५० लाख – गुजरात जायन्ट्स
हादी ओशतोरक – २० लाख – गुजरात जायन्ट्स
जिया उर रहमान – १२.२० लाख – बेंगलुरु बुल्स
अबुलफजल मघसौदलू – १३ लाख – बेंगलुरु बुल्स
डोंग जीऑन ली – १२.५० लाख – बेंगलुरु बुल्स
एमाद सेदाघट निया – १०.२० लाख – दबंग दिल्ली
मोहम्मद इस्माईल मघसौदलू – १३.२० लाख – हरियाणा स्टीलर्स
मोहम्मद अमीन नोसराटी – ११ लाख – जयपूर पिंक पँथर्स
आमिर हुसेन मोहम्मदमलेकी – १० लाख – जयपूर पिंक पँथर्स
अन्वर बाबा – १० लाख – तमिळ थलायवाज
मोहम्मद तुहिन तरफदेर – १० लाख – तमिळ थलायवाज
हयूनसु पार्क – १० लाख – तेलुगू टायटन्स
मोहम्मद मसूद करीम – १० लाख – युपी योद्धा
मोहम्मद ताघी – १२ लाख – युपी योद्धा
महत्त्वाच्या बातम्या –
–दीपक हुड्डाच्या किमतीवर चाहते नाराज, पीकेएल लिलावात केवळ ‘इतक्या’ लाखांची लागली बोली
–बंगालचा वाघ आता खेळणार पायरेट्स संघासाठी, जँग कुन लीवर लागली ‘इतक्या’ लाखांची बोली
–पीकेएल लिलावाचा दुसरा दिवस विक्रमी, परदीप, सिद्धार्थ झाले ‘करोडपती’; पाहा बोली लागलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी