---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ चा लिलाव संपन्न, ‘असे’ आहेत सर्व १२ संघ

---Advertisement---

‘प्रो कबड्डी लीग’ 2021 लिलावाचा तिसरा आणि शेवटचा दिवस चांगल्या गोष्टींनी संपला. सर्व 12 फ्रँचायझींनी ‘ब’, ‘क’ आणि ड’ श्रेणीतील खेळाडूंनी आपले पथक भरले आहे. पीकेएलच्या आगामी आठव्या हंगामाचा चषक जिंकण्यासाठी फ्रँचायझींनी पूर्ण ताकदीचे संघ तयार केले आहेत.

पीकेएल लिलाव 2021 च्या उद्घाटनाच्या दिवशी फारशा बोली लागल्या नाहीत. त्यामुळे न्यू यंग प्लेयर्स श्रेणीतील फक्त चार खेळाडू लिलावात निवडले गेले. दुसऱ्या दिवसाची सुरुवात परदेशी खेळाडूंच्या लिलावाने झाली, जिथे इराणचा प्रतिभावान खेळाडू मोहम्मदरेझा शादलो चियानेह याला पाटणा पायरेट्सने 31 लाखांत विकत घेतले. नंतर संध्याकाळी, परदीप नरवाल पीकेएलच्या लिलावाच्या इतिहासातील सर्वाधिक पैसे मिळवणारा खेळाडू बनला आहे. यूपी योद्धा संघाने तब्बल 1.65 कोटी रुपयांची महागडी बोली लावत त्याला विकत घेतले आहे.

तसेच, तेलुगू टायटन्सने त्यांचा स्टार रेडर सिद्धार्थ देसाईला 1.30 कोटीच्या रक्कमेवर अंतिम बिड मॅच (एफबीएम) कार्ड वापरून संघात परत आणले. शेवटच्या दिवशी, जयपूर पिंक पँथर्सने माजी यू मुम्बा रेडर अर्जुन देशवालला ९६ लाखांना खरेदी केले, ज्यामुळे ती पीकेएल लिलाव 2021 ची तिसरी सर्वात महागडी बोली ठरली.

दीपक निवास हुडा (जयपूर पिंक पँथर्स), राहुल चौधरी (पुणेरी पल्टन), अजय ठाकूर (दबंग दिल्ली केसी), आणि रोहित कुमार (तेलुगू टायटन्स) या अनुभवी खेळाडूंकडे फ्रँचायझींनी फारसे लक्ष दिले नाही. दरम्यान, विशाल माने, मोहित छिल्लर, नीलेश साळुंके, रणसिंह आणि फरहाद मिलागर्दनसारख्या दिग्गज खेळाडूंवर बोलीच न लागल्याने ते अनसोल्ड राहिले.

‘प्रो कबड्डी लीग 2021’चे सर्व 12 संघ-

बंगाल वॉरियर्स
मनिंदर सिंग, मोहम्मद इस्माइल नबीबख्श, रिंकू नरवाल, रवींद्र रमेश कुमावत, अबोझार मिघानी, सुकेश हेगडे (FBM), सुमित सिंग, मनोज गौडा के., विजिन थंगादुराई, परवीन, रोहित बन्ने, दर्शन जे, सचिन विट्टला, आकाश पिकालमुंडे, रोहित आणि रिशांक देवाडिगा.

बंगळुरू बुल्स
पवन सेहरावत, अमित शेरोन, सौरभ नंदाल, बंटी, मोहित सेहरावत, झियाउर रहमान, डोंग जिओन ली, अबोलफझल मघसोदलोमहाली, महेंद्र सिंह (एफबीएम), चंद्रन रणजीत, मोरे जीबी, दीपक नरवाल, मयूर जगन्नाथ कदम, अंकित आणि विकास.

दबंग दिल्ली
विजय, नीरज नरवाल, नवीन कुमार, बलराम, सुमित, मोहित, मोहम्मद मलक, इमाद सेदाघाटनिया, संदीप नरवाल, जोगिंदर सिंह नरवाल, जीव कुमार, अजय ठाकूर, विकास, मंजीत छिल्लर आणि सुशांत सेल.

गुजरात जायंट्स
परवेश भैंसवाल, सुनील कुमार, हरमनजीत सिंग, सुमित, अंकित, सोलेमन पहलेवानी, हादी ओष्टोरक, रविंदर पहल, सोनू जगलान (एफबीएम) महेंद्र गणेश राजपूत, रथन के, मनिंदर सिंग, हर्षित यादव, गिरीश मारुती एर्नाक, परदीप कुमार आणि अजय कुमार.

हरियाणा स्टीलर्स
विकास कंडोला, विनय, विकास छिल्लर, चंद सिंग, हमीद मिर्झाई नादर, मोहम्मद इस्माइल मगशोदलो, रोहित गुलिया, विकास जगलन, रवी कुमार (एफबीएम), सुरेंद्र नाडा, राजेश नरवाल, ब्रिजेंद्र सिंह चौधरी, अजय घंगास आणि राजेश गुर्जर.

जयपूर पिंक पँथर्स
अमित हुडा, विशाल लाथर, नितीन रावल, सचिन नरवाल, पवन टीआर, सुशील गुलिया, एलावारासन ए, अमीर होसेन मोहम्मदमालेकी, मोहम्मद अमीन नोसरती, दीपक निवास हुडा (एफबीएम), संदीप धुळ (एफबीएम), धर्मराज चेरलाथन, नवीन बज्जाद, अर्जुन देशवाल, अमित खरब, अशोक, अमित नगर आणि शौल कुमार.

पाटणा पायरेट्स
नीरज कुमार, मोनू, साहिल मान, राजवीरसिंह प्रताप राव चव्हाण, मोहित, जंग कुन ली (एफबीएम), मोहम्मदरेझा शादलोई चियानेह, प्रशांत कुमार राय, सचिन तंवर, सुनील नरवाल, साजीन चंद्रसेकर, सौरव गुलिया, संदीप, शुभम शिंदे, गुमान सिंग आणि मोनू गोयत.

पुणेरी पलटण
बाळासाहेब शहाजी जाधव, पवनकुमार कादियन, हादी ताजिक, संकेत सावंत, पंकज मोहिते, गोविंद गुर्जर, मोहित गोयत, व्हिक्टर ओबिरो, विशाल भारद्वाज, बलदेव सिंह, राहुल चौधरी, नितीन तोमर (एफबीएम), ई सुभाष, सोमबीर , करमवीर, विश्वास एस, अबिनेश नादराजन आणि सौरव कुमार.

तमिळ थलाईवास
सागर, हिमांशू, एम अभिषेक, अन्वर साहिद बाबा, मोहम्मद तुहिन तरफदार, पीओ सुरजीत सिंग, के प्रपंजन, मंजीत दहिया, सौरभ तानाजी पाटील, भवानी राजपूत, अजिंक्य अशोक पवार, साहिल, अथुल एमएस, सागर बी कृष्णा आणि संथापनसेल्वम.

तेलुगू टायटन्स
राकेश गौडा, अंकित बेनीवाल, रजनीश, मनीष, आकाश चौधरी, आकाश दत्तू अर्सूल, राजकुमार, आबे टेट्सुरो, ह्युनसू पार्क, सुरिंदर सिंग, सिद्धार्थ देसाई (एफबीएम), रोहित कुमार, ऋतुराज शिवाजी कोरवी, आदर्श टी, गल्ला राजू रेड्डी, अमित चौहान आणि सी. अरुण.

यू मुंबा
अभिषेक सिंग, अजिंक्य रोहिदास कापरे, हरेंद्र कुमार, फाजेल अत्राचली, नवनीत, मोहसेन मघसौदलुजाफारी, अजित व्ही कुमार, पंकज, रिंकू, सुनील गिद्धगवली, अजीत, जशानदीप सिंग, राहुल राणा आणि आशिष कुमार सांगवान.

यूपी योद्धा
नितेश कुमार, सुमित सांगवान, आशु सिंग, सुरिंदर गिल, नितीन पंवार, मोहम्मद तगी पायन महाली, मो. मसूद करीम, परदीप नरवाल आणि श्रीकांत जाधव (एफबीएम), गुरदीप, गौरव कुमार, साहिल, गुलवीर सिंग, अंकित आणि आशिष नगर.

महत्त्वाच्या बातम्या-

भारीच! ४६ वर्षीय चेरलाथन पीकेएलच्या ७ संघांचा भाग होणारा पहिलाच कबड्डीपटू, ‘या’ संघांचे केलेय प्रतिनिधित्त्व

अखेर गिरीश इर्नाक आणि रिशांक देवडिगाला खरेदीदार मिळाला, ‘या’ संघात झाले सामील

प्रो कबड्डी लिलावाची सांगता; सिद्धार्थ, गिरिश, रिशांकसह ‘या’ महाराष्ट्रीयन कबड्डीपटूंवर लागली बोली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---