---Advertisement---

‘सदर्न डर्बी’त तमिल थलाइवाजची बाजी! बेंगलोर बुल्स पुरती निष्प्रभ

On: रविवार, जानेवारी 30, 2022 9:40 PM
---Advertisement---

रविवारी (३० जानेवारी) प्रो कबड्डी लीगमध्ये दुसऱ्या सामन्यात ‘सदर्न डर्बी’ पाहायला मिळाली. तमिल थलाइवाज विरुद्ध बेंगलोर बुल्स या सामन्यात तमिल संघाने पूर्ण ताकदीनिशी खेळ दाखवत बेंगलोर संघाला ४२-२४ असे पराभूत केले.

या सामन्यात प्रेक्षकांना अटीतटीची लढत पाहायला मिळेल असा सर्वांचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात उलटेच घडले. पवन सेहरावतच्या नेतृत्वातील बेंगलोर बुल्स तमिल तलावात सामना करू शकले नाहीत. पहिला हाफमध्ये दोन वेळा ऑल आउट होत, ते पहिल्या हाफच्या अखेरीस २१-८ असे पीछाडीवर राहिले. तमिल संघासाठी अभिषेक व सागर यांनी डिफेन्समध्ये तर, मंजित व अजिंक्य पवार यांनी रेडींगमध्ये गुण कमावले.

दुसऱ्या हाफमध्येही तमिल संघाने आपला आक्रमक खेळ तसाच सुरू ठेवला. ते पवन सेहरावत याला सातत्याने बाहेर ठेवण्यात यशस्वी ठरत होते. दुसरीकडे अजिंक्य पवार तमिल संघासाठी गुण मिळवत राहिला. अखेरच्या पाच मिनिटात तमिलकडे ३६-१७ अशी आघाडी होती. त्यानंतर बेंगलोरने केवळ पिछाडी भरून काढण्याचे काम केले. स्वतः कर्णधार पवनने यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, पूर्ण वेळेनंतर बेंगलोरला २४-४२ असा पराभव पत्करावा लागला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---