---Advertisement---

प्रो कबड्डी सीजन ७ च्या प्ले-ऑफच्या सामन्यांना आजपासून सुरुवात

On: सोमवार, ऑक्टोबर 14, 2019 2:57 PM
---Advertisement---

प्रो कबड्डी सीजन ७ अखेरच्या टप्पात येऊन पोहचला आहे. आजपासून प्ले-ऑफच्या लढतीना सुरुवात होत आहे. सीजन ७ मध्ये बदलल्या फॉरमॅट नुसार टॉप सहा संघ प्ले-ऑफमध्ये दाखल झाले आहेत. दोन एलिमीनेटर, दोन उपांत्य सामने आणि अंतिम सामना अशाप्रकारे सामने होतील.

आज (१४ ऑक्टोबर,२०१९) ट्रान्सस्टॅडिया, अहमदाबादच्या इको एरेना येथे दोन एलिमीनेटर सामने होतील. गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघ युपी योद्धा विरुद्ध सहाव्या क्रमांकावर असलेल्या बेंगळुरू बुल्स संघ यांच्यात पहिला एलिमीनेटर सामना होईल.

दुसऱ्या एलिमीनेटर सामन्यांत चौथ्या क्रमांकावर असलेल्या यु मुंबाची लढत पाचव्या क्रमांकावर असलेल्या हरियाना स्टीलर्स विरुद्ध होईल. दोन्ही संघ तुलनेने चांगले असून हरियानाचे रेडर विरुद्ध मुंबईचे डिफेंडर अशी लढत बघायला मिळू शकते.

दबंग दिल्ली व बंगाल वारीयर्स दोन्ही संघानी गुणतालिकेत पहिले दोन क्रमांक मिळवले असल्याने थेट सेमी उपांत्यफेरीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा सामना आज होणाऱ्या एलिमिनेटरच्या सामन्यांमधील विजेत्या संघाशी उपांत्यफेरीत होईल.

एलिमीनेटर सामने:

१४ ऑक्टोबर – यूपी योद्धा विरुद्ध बेंगळुरू बुल्स – वेळ – संध्या. ७:३०

१४ ऑक्टोबर – यु मुंबा विरुद्ध हरियाना स्टीलर्स – वेळ – संध्या. ८:३०

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---