मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला भारतीय संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौरा करत आहे. या दौऱ्यावर टी२०, वनडे व कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघात केवळ ७ खेळाडू असे आहेत, ज्यांना तिनही प्रकारात संघात संधी दिली आहे. आज बीसीसीआयच्या बैठकीत या दौऱ्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली.
ते ७ शिलेदार
भारतीय संघ या दौऱ्यात तीन टी -20, तीन वनडे आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार विराट कोहली, मर्यादीत षटकांचा उपकर्णधार केएल राहुल, मयांक अगरवाल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व नवदीप सैनी या सातच खेळाडूंना तिनही संघात संधी देण्यात आली आहे.
केएल राहुल उपकर्णधार
विशेष म्हणजे केएल राहुलची वनडे व टी२० मध्ये उपकर्णधार व विकेटकिपर म्हणून तर कसोटीत फलंदाज म्हणून निवड झाली आहे. त्याचबरोबर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या नवदीप सैनीची गोलंदाज म्हणून तिन्ही प्रकारात निवड झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात वनडे व टी२० खेळलेल्या सैनीला कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
मयांक अगरवालला टी२० पदार्पणाची संधी
११ कसोटी व ३ वनडे सामने खेळलेल्या मयांक अगरवाललाही आयपीएलमध्ये चांगले खेळण्याचे बक्षीस मिळाले असून त्याला वनडे व कसोटीबरोबर टी२० संघातही स्थान देण्यात आले आहे. बाकी कर्णधार विराट कोहली, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह हे भारतीय संघाचे तिनही प्रकारातील नियमीत सदस्य आहेत.
थोडक्यात हुकली संधी
शुबमन गिल व कुलदीप यादवला टी२० संघात स्थान देण्यात आले नाही तर श्रेयस अय्यर, शिखर धवन, हार्दिक पंड्या व युझवेंद्र चहल हे कसोटी संघाचे भाग नसतील.
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेट- कीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद. सिराज
वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; पाहा टी-२०, वनडे आणि कसोटी संघाची संपुर्ण यादी