fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाढदिवसादिवशीच धोनीला मिळाली वाईट बातमी; ‘हा’ संघसहकारी झाला…

July 9, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0

मंगळवारी (७ जुलै) भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आपला वाढदिवस साजरा केला. त्याला त्याच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त अवघ्या क्रिकेट जगतातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचदरम्यान धोनीसोबत खेळलेला एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला.

एमएस धोनीच्या ३९ व्या वाढदिवसावेळी त्याचा संघसहकारी दुखापतग्रस्त

धोनीला (MS Dhoni) आपल्या चाहत्यांकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मिळाल्या. परंतु यादरम्यान आयपीएल फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings) खेळलेला न्यूझीलंडचा माजी कर्णधार म्हणजेच ब्रेंडन मॅक्यूलम (Brendon McCullum) एका रग्बी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला.

धोनीबरोबर सीएसकेकडून खेळलेला ब्रेंडन मॅक्यूलम दुखापतग्रस्त; झाला रुग्णालयात दाखल

न्यूझीलंडचा माजी महान यष्टीरक्षक फलंदाज मॅक्यूलमने धोनीच्या वाढदिवसा वेळी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला. त्यामध्ये तो एका रुग्णालयात बेड वर झोपलेला दिसत आहे.

खरंतर तो शनिवारी (४ जुलै) न्यूझीलंडमध्ये एका रग्बी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्या दरम्यान तो त्या सामन्यात युनायटेड माटामाटा संघाकडून खेळत होता. या सामन्यात त्याच्या संघाने ३२-३० च्या अंतराने विजय मिळविला होता. परंतु यादरम्यान त्याला दुखापतीचा सामना करावा लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

View this post on Instagram

After our thriller 32-30 win Saturday for @ums_rugby, had to skip training tonight to tend to an old injury to the snout👃courtesy of my mate @brettlee_58 handiwork back in @bbl debut season! Should be back on deck with the lads come Saturday hopefully. 🏉💪🏻

A post shared by Brendon McCullum (@bazmccullum42) on Jul 7, 2020 at 12:32am PDT

मॅक्यूलम आता आहे कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक

मॅक्यूलम तसं पाहिलं तर आपल्या दुखापतीतून बरा होत आहे. परंतु त्याने फोटो पोस्ट केल्यानंतर चाहते लगोलग त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. मॅक्यूलमने न्यूझीलंडचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे.

याव्यतिरिक्त आयपीएलमध्येही बऱ्याच संघाकडून तो खेळला आहे. त्यात सीएसकेकडून धोनीच्या नेतृत्वातही काही वर्षे खेळला आहे. सध्या तो आयपीएलच्या १३ व्या मोसमासाठी कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-पहिला कसोटी सामना: नाणेफेकीच्या वेळी जेसन होल्डरला आयसीसीच्या नियमांचा विसर, केली ही सर्वात मोठी चूक

-सचिनच्या अखेरच्या वनडेत खेळलेले ११ खेळाडू सध्या करतात तरी काय?

-रोहित की सचिन? वाचा कोणाची आकडेवारी ओपनर म्हणून आहे सरस


Previous Post

जो आपल्या बायकोला सांभाळू शकत नाही, तो भारतीय संघाला काय सांभाळणार?

Next Post

बेन स्टोक्स झाला इंग्लंडचा ८१ वा कर्णधार पण तरीही ‘हा’ दिग्गज मात्र नाराज

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

जबरदस्त! अवघ्या १४ धावा करुनही आझमची ट्वेंटी ट्वेंटीतील मोठ्या विक्रमाला गवसणी, ठरला पहिलाच

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

पराभवाचं दुख अन् त्यात शिक्षा! ‘या’ कारणामुळे एमएस धोनीला तब्बल १२ लाखांचा झाला दंड

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/@ChennaiIPL
IPL

DC च्या हातून CSK चारीमुंड्या चित, कॅप्टन धोनीने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL
IPL

‘या’ संघाविरुद्ध चेन्नई नेहमीच गंडते; पाहा चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करणारे संघ

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

फाफ डू प्लेसिसला शुन्यावर बाद करणारा आवेश खास चौथाच गोलंदाज, पाहा कोण आहेत अन्य तीन गोलंदाज

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

कहर! धोनी थोडेथोडके नाही तब्बल ६ वर्षे आणि १०८ डावानंतर झालाय शुन्यावर बाद, वाचा ही आकडेवारी

April 11, 2021
Next Post

बेन स्टोक्स झाला इंग्लंडचा ८१ वा कर्णधार पण तरीही 'हा' दिग्गज मात्र नाराज

गांगुलीने नुसती दादागिरीच नाही केली तर हे '५ कोहिनुर हिरे' दिले टीम इंडियाला

जाफर म्हणतो; टीम इंडियातील 'हा' खेळाडू आहे हिरा, खेळू शकतो अनेक वर्ष कसोटी क्रिकेट

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.