आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी सर्व ८ संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. काही संघांनी अनुभवी खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. तर काही संघांनी युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. यामध्ये कोलकता नाईट रायडर्स संघाचा युवा खेळाडू व्यंकटेश अय्यर आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा उमरान मलिक यांना ४० टक्के अधिक रक्कम मिळाली आहे. चला तर पाहूया असे १० खेळाडू ज्यांना आधीच्या हंगामापेक्षा जास्तीची किंमत देऊन रिटेन करण्यात आले आहे.
१) व्यंकटेश अय्यर – कोलकाता नाईट रायडर्स संघाचा युवा खेळाडू व्यंकटेश अय्यर याने आयपीएल २०२१ मधील आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघात देखील स्थान देण्यात आले होते. ही कामगिरी पाहता त्याला आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी ४० टक्के अधिक रक्कम देऊन रिटेन करण्यात आले आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याला २० लाखांची बोली लावून खरेदी करण्यात आले होते. तसेच आता त्याला ८ कोटी रुपये मिळणार आहेत.
२) उमरान मलिक – जम्मू-काश्मीरच्या उमरान मलिकला देखील ४० टक्के अधिक रक्कम मिळाली आहे. उमरान मलिकला सनरायझर्स हैदराबाद संघाने १० लाख रुपये खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. परंतु आता आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी त्याला ४ कोटी रुपये देऊन रिटेन केले आहे.
३) मयंक अगरवाल – केएल राहुलने पंजाब किंग्ज संघाची साथ सोडणे हे मयंक अगरवालसाठी फायदेशीर ठरले आहे. मयांक अगरवालला पंजाब किंग्ज संघाने १२ कोटी रुपयांत रिटेन केले आहे. यापूर्वी त्याला १ कोटी रुपये दिले जात होते.
४) अब्दुल समद – अब्दुल समदला सनरायझर्स हैदराबाद संघाने ४ कोटी रुपये खर्च करत रिटेन केले आहे. त्याला आयपीएल २०२१ स्पर्धेत २० लाखांची बोली लावत खरेदी केले होते.
५) ऋतुराज गायकवाड – चेन्नई सुपर किंग्ज संघाचा विस्फोटक फलंदाज ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ कोटी रुपयांत रिटेन केले आहे. त्याला आतापर्यंत ४० लाख रुपये मानधन मिळत होते.
६) अर्शदीप सिंग – पंजाब किंग्ज संघाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगवर देखील पैशांचा पाऊस पडला आहे. आतापर्यंत त्याला २० लाख रुपये मानधन मिळत होते. परंतु आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी त्याला ४ कोटी रुपये मानधन मिळणार आहे.
७) पृथ्वी शॉ – दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला देखील रिटेन करण्यात आले आहे. यापूर्वी त्याला १.५ कोटी रुपये मानधन म्हणून मिळत होते. परंतु आगामी हंगामात त्याला ७.५ कोटी रुपये मिळणार आहेत. शिखर धवन, श्रेयस अय्यरसारख्या दिग्गजांना रिलीज करून दिल्ली कॅपिटल्स संघाने पृथ्वी शॉला रिटेन केले आहे.
८) संजू सॅमसन – राजस्थान रॉयल्स संघाने संजू सॅमसनवर विश्वास दाखवून त्याला रिटेन केले आहे. त्याला राजस्थान रॉयल्स संघाने १४ कोटी रुपये देऊन रिटेन केले आहे. यापूर्वी त्याला ८.५ कोटी रुपये मानधन दिले जात होते.
९) मोहम्मद सिराज – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेलसह मोहम्मद सिराजला देखील रिटेन केले आहे. यापूर्वी त्याला २.६ कोटी रुपये दिले जात होते. तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेत त्याला ७ कोटी रुपये दिले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: हे चित्र आशादायी! देशाबाहेरील छावणीत अफगान मुले लुटतायेत क्रिकेटचा आनंद
केएल राहुलनंतर ‘या’ दिग्गजानेही सोडली पंजाब किंग्जची साथ, नव्या संघामध्ये दिसू शकतो नव्या भूमिकेत