भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले असून मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. मात्र, या दोन्ही सामन्यात दोन्ही संघांचे वरिष्ठ खेळाडू खेळले नव्हते. त्यांना विश्रांती देण्यात आली होती. अशात भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, या मालिकेचे आयोजन केले जात असले, तरीही असे वाटते की, कोणताही खेळाडू ही मालिका खेळण्यात रस दाखवत नाहीये. चोप्रानुसार, खेळाडू मजबुरी म्हणून हे सामने खेळत आहेत.
काय म्हणाला आकाश चोप्रा?
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्या मते, दोन्ही संघांच्या खेळाडूंचा दृष्टिकोन पाहता असे दिसते की, हे सामने खेळण्यासाठी कुणीच इच्छूक नाहीये. त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना चोप्रा म्हणाला, “रोहित शर्मा आणि विराट कोहली तिसऱ्या वनडेसाठी परत आले आहेत. मात्र, अनेक खेळाडू अजूनही उपस्थित नाहीत. कोणालाही समजत नाहीये की, काय सुरू आहे. तसेच, एवढे खेळाडू उपलब्ध का नाहीयेत. आपण विश्वचषकाच्या एवढे जवळ आहोत, पण हे सामने का खेळले जात आहेत? दोन्ही संघांना पाहून वाटते की, जसे ते विचारत आहेत की, तुम्ही आम्हाला का खेळवत आहात. कोणालाही यात रस नाहीये. फक्त सामना होत आहे, त्यामुळे ते खेळत आहेत.”
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत उभय संघाच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी भाग घेतला नाहीये. ऑस्ट्रेलियाकडून मागील 2 सामन्यात मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल खेळताना दिसले नव्हते. याव्यतिरिक्त पॅट कमिन्स यानेही फक्त एकच सामना खेळला. तसेच, भारताकडून पहिल्या दोन्ही सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्या खेळले नाहीत. आता तिसऱ्या सामन्यात, शुबमन गिल, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या यांसारखे खेळाडू बाहेर आहेत. (players are not interested in ind vs aus odi series says this former cricketer)
तिसऱ्या वनडेसाठी उभय संघ-भारत
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा
ऑस्ट्रेलिया
मिचेल मार्श, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तन्वीर संघा, जोश हेझलवूड
हेही वाचा-
कृष्णा जोमात, वॉर्नर कोमात! सलग तिसरे अर्धशतक ठोकणाऱ्या स्टार फलंदाजाचा प्रसिद्धने केला खेळ खल्लास
अब आयेगा मजा! तिसऱ्या वनडेत कमिन्स ‘टॉस का बॉस’, दोन्ही संघांच्या ‘या’ स्टार खेळाडूंचे पुनरागमन