भारताने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या वन-डे सामन्यात 7 विकेट्सने पराभूत केले आहे. यामुळे भारताने तीन वन-डे सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली आहे. हा भारताचा ऑस्ट्रेलियामध्ये पहिलाचा द्विपक्षीय वनडे मालिका विजय ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 231 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना भारताकडून यष्टीरक्षक एमएस धोनीने 114 चेंडूत नाबाद 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. त्याला केदार जाधवने नाबाद 61 धावा करत योग्य साथ दिली आहे.
आजच्या खेळीमुळे वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या खेळाडूंमध्ये धोनीने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पॉटींगला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.
धोनीने 335 वन-डे आतंरराष्ट्रीय सामने खेळताना 112 वन-डे सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना संघाला सामना जिंकून दिला आहे.
वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणाऱ्यांमध्ये सचिन तेंडुलकर 127 सामन्यांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर रिकी पॉंटींग 111 सामन्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणारे क्रिकेटपटू-
सचिन तेंडुलकर – 127 सामने
एमएस धोनी – 112* सामने
रिकी पॉंटींग – 111 सामने
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाचा नादच खूळा! कोणत्याही संघाला जमले नाही ते करुन दाखवले
–ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेप्रमाणेच वनडेतही टिम इंडियाने रचला इतिहास
–चार वर्षांनंतर धोनीने केली त्या पराक्रमाची पुनरावृत्ती