fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

लाॅकडाऊनमध्ये सराव करणे खेळाडूंना पडले महागात, लोकांनी केले…

Players Returned to Training got Tornted by own Countrymen in Spain

कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशामध्ये स्पेेनचे खेळाडू लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या सूटदरम्यान बऱ्याच दिवसांनंतर सराव करण्यासाठी गेले असता, त्यांना लोकांचे बोलणे ऐकावे लागले.

दोन महिन्यांच्या क्वारंटाईननंतर स्पेनमधील खेळाडूंना सराव सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु यातील काही खेळाडूंना स्थानिक नागरिकांंच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्या लोकांना असे वाटले की, हे खेळाडू लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत.

स्पेन सरकारने (Spain Government) कोरोना व्हायरस (Corona Virus) या साथीच्या आजारामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काही नियमांमध्ये सूट दिली आहे. परंतु अधिकाधिक नागरिकांवर व्यायामासाठी जिममध्ये जाण्यास बंदी आहे. तरीही, वयोगटानुसार काही लोकांना विशिष्ट वेळी बाहेर जाण्याची परवानगी दिली आहे.

व्यावसायिक आणि अव्वल खेळाडूंना याबाबतील सूट दिली आहे. त्यामुळे ते केव्हाही सराव आणि व्यायाम करू शकतात. लोक आपल्याला दिलेला वेळ सोडून इतर नागरिकांंना रस्त्यावर पाहून आनंदी नव्हते. याचे कारण असे असू शकते की, नागरिकांना ते नियम माहित नसतील किंवा त्यांनी खेळाडूंना ओळखले नसेल.

स्पेनची धावपटू क्रिस्टीना लाराने (Cristina Lara) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “यापूर्वी कधीच लोकांनी मला इतक्या वाईट पद्धतीने पाहिले नाही. तसेच मीदेखील इतके नकारात्मक बोलणे कधीही ऐकले नाही. माझ्या सहकाऱ्यांनादेखील टोमणे खावे लागले. असे वाटत होते की, आपली ओळख सांगणारी चिन्हे घेऊन आपल्याला बाहेर पडावं लागेल.”

क्रिस्टीना पुढे म्हणाली की, “ती सकाळी १०.३० वाजता बाहेर पडली होती. ही वेळ ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित आहे. तर लहान मुले दुपारी १२ पासून संध्याकाळी ७ पर्यंत आई-वडिलांबरोबर बाहेर जाऊ शकतात. इतर लोक सकाळी ६ ते १० पर्यंत किंवा रात्री ८ ते ११ पर्यंत बाहेर पडू शकतात. तरीही लोकांना नेहमी आपल्या घराच्या १ किलोमीटरच्या अंतरामध्येच रहावे लागेल.

ट्रेंडिंग घडामोडी-

-शांत पुजाराला ट्रोल करणं विराटला पडलं भलतंच महागात, पुजाराने घेतला…

-कर्णधार असताना विराट, धोनीने युवराजच्या पाठीत खंजीर खुपसला

-राजस्थान राॅयल्सची ऑल टाईम ११, दोन नावं आहेत आश्चर्यचकित करणारी

You might also like