---Advertisement---

पहिल्या ६ षटकांमध्येच गोलंदाजांचा धुव्वा उडवणारे विस्फोटक फलंदाज

On: मंगळवार, ऑक्टोबर 27, 2020 9:05 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० चा ४७ वा सामना मंगळवारी (२७ ऑक्टोबर) दुबई येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात हैदराबाद संघाचा धडाकेबाज कर्णधार डेविड वॉर्नरने एक कारनामा केला आहे.

नाणेफेक जिंकून दिल्लीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि हैदराबादला फलंदाजासाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून वॉर्नर आणि वृद्धिमान साहाने डावाची सुरुवात केली. यादरम्यान वॉर्नरने जोरदार फटकेबाजी करत सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौकार ठोकत अर्धशतक झळकावले. त्यानंतर पुढच्या सहाव्या चेंडूवरही चौकार ठोकत त्याने अवघ्या २६ चेंडूत ५४ धावा केल्या. वॉर्नरचे हे आयपीएल इतिहासातील ४७ वे अर्धशतक होते.

यासह तो आयपीएलमध्ये पहिल्या सहा षटकात सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत ६ वेळा हा कारनामा केला आहे.

यापूर्वी आयपीएलमध्ये पहिल्या सहा षटकात सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा कारनामा युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल (३ वेळा), तर केएल राहुल आणि सुनील नरेनने प्रत्येकी २ वेळा केला आहे.

वॉर्नरने या सामन्यात ३४ चेंडूंचा सामना करत ६६ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ८ चौकारही ठोकले.

आयपीएलमध्ये पहिल्या सहा षटकात सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज

६* वेळा- डेविड वॉर्नर
३ वेळा- ख्रिस गेल
२ वेळा- ख्रिस गेल
२ वेळा- सुनील नरेन

महत्त्वाच्या बातम्या-

-चाहत्यांसाठी खुशखबर! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झालेला रोहित शर्मा खेळणार हैदराबाविरुद्धचा सामना?

-धक्क्यावर धक्के! आंद्रे रसेलसह पाच परदेशी खेळाडूंची ‘या’ मोठ्या टी२० लीगमधून माघार

-काय सांगता! एबी डिविलियर्सची ‘या’ प्रसिद्ध टी२० लीगमधून माघार

ट्रेंडिंग लेख-

-चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे

-…आणि सचिनचे शब्द‌ हार्दिकने खरे करून दाखवले !

-बीडच्या छोट्याशा गावातील ‘या’ पोरानं क्रिकेटचं मैदान अक्षरशः दणाणून सोडलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---