---Advertisement---

‘हा’ विक्रम करत स्मिथने पटकावलं सचिनच्या पंक्तीत स्थान

On: रविवार, नोव्हेंबर 29, 2020 6:21 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना रविवारी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव स्मिथने शतक झळकावले याबरोबरच त्याने एका खास विक्रमाची नोंद केली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये खेळवण्यात आलेल्या वनडे सामन्यांत सलग तीन शतके ठोकणारा स्टीव स्मिथ केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. ह्यापूर्वी अशी कामगिरी केवळ भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर होती. सचिनने १९९८ मध्ये ही कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन सामन्यांत अनुक्रमे १४३, १३४ आणि १४१ धावा फटकाविल्या होत्या.

स्टीव स्मिथने रविवारच्या सामन्यांत ६४ चेंडूत १०४ धावांची खेळी करत मास्टर ब्लास्टरसह संयुक्तपणे या पंक्तीत स्थान मिळविले. ह्यापूर्वी भारताविरुद्ध खेळलेल्या मागील दोन वनडे सामन्यात त्याने अनुक्रमे १३१ आणि १०५ धावांच्या खेळी उभारल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाचे भारताला ३९० धावांचे आव्हान

सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या वनडे सामन्यांत स्टीव स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३८९ धावांचा डोंगर उभारला. स्मिथला डेव्हिड वॉर्नर(८३), ऍरोन फिंच(६०), ग्लेन मॅक्सवेल(६३*) आणि मार्नस लबूशने(७०) ह्यांनी अर्धशतके करत सुरेख साथ दिली. ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या तडाख्यासमोर भारतीय गोलंदाजी पुन्हा निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतीय गोलंदाजी पुन्हा निष्प्रभ! २ दिवसांपूर्वीच रचलेला विक्रम ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पुन्हा मोडला

भारतीय वनडे संघाला लवकरच ‘हे’ तीन दिग्गज ठोकू शकतात राम – राम

“ही तर आयपीएल कराराची परतफेड”, ऑस्ट्रेलियन खेळाडूने सोडलेल्या कॅचवर माजी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---