सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर रविवारी(२९ नोव्हेंबर) दुसरा वनडे सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी केली. याबरोबरच त्याने भारताविरुद्ध एक खास विक्रमही केला आहे.
स्मिथने या सामन्यात ६४ चेंडूत १०४ धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने १४ चौकार आणि २ षटकार मारले. स्मिथचे हे भारताविरुद्ध वनडेतील ५ वे शतक आहे. स्मिथने कसोटीमध्ये भारताविरुद्ध ७ शतके केलेली आहेत. त्यामुळे एकाच संघाविरुद्ध कसोटी आणि वनडे क्रिकेट प्रकारात प्रत्येकी ५ किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. असा पराक्रम करणारा तो ८ वा फलंदाज ठरला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून याआधी असा पराक्रम रिकी पाँटिंगने केला आहे. पाँटिंगने इंग्लंड आणि भारताविरुद्ध वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी ५ किंवा त्यापेक्षा अधिक शतके केली आहेत.
रविवारी स्मिथच्या शतकी खेळीच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३८९ धावांचा डोंगर उभा केला.
एकाच संघाविरुद्ध वनडे आणि कसोटीमध्ये प्रत्येकी ५ किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारे क्रिकेटपटू –
डेसमंड हाइन्स – विरुद्ध ऑस्ट्रेलिया
सचिन तेंडुलकर – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका,
माहेला जयवर्धने – विरुद्ध इंग्लंड
रिकी पाँटिंग – विरुद्ध इंग्लंड, भारत
कुमार संगकारा – विरुद्ध बांगलादेश, भारत
एबी डिविलियर्स – विरुद्ध वेस्ट इंडिज
विराट कोहली – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, श्रीलंका
स्टिव्ह स्मिथ – विरुद्ध भारत
सलग दोन वनडेत ७० पेक्षा कमी चेंडूत शतक
स्मिथने सलग दुसऱ्या वनडेत शतक केले आहे. याआधी त्याने शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) भारताविरुद्ध पहिल्या वनडेत शतक केले होते. विशेष म्हणजे दोन्ही सामन्यात स्मिथने ६२ चेंडूतच शतक केले आहे. त्यामुळे सलग दोन वनडे सामन्यात ७० पेक्षा कमी चेंडूत शतक करणारा तो दुसरा फलंदाज आहे.
याआधी जॉनी बेअरस्टोने २०१८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ५८ चेंडूत आणि स्कॉटलंड विरुद्ध ५४ चेंडूत शतके केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
संकटमोचक पांड्या ! शतकवीर स्मिथला तंबूत धाडत हार्दिकचे जोरदार पुनरागमन
भारताने ९८८ वनडे सामने खेळले, पण ‘असा’ नकोसा विक्रम पहिल्यांदाच झाला
दुसऱ्या वनडे दरम्यान मैदानातच फिंच- केएल राहुलची मस्ती, पाहा व्हिडिओ