---Advertisement---

तेंडुलकर ते सुदर्शन: पदार्पणात ‘डक’वर होणाऱ्या दिग्गजांची यादी!

On: शनिवार, जून 21, 2025 1:38 PM
---Advertisement---

भारताच्या युवा फलंदाज साई सुदर्शन याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याचा समावेश करण्यात आला. भारताच्या कसोटी संघातील 317वा खेळाडू म्हणून त्याला चेतेश्वर पुजाराच्या हस्ते टेस्ट कॅप मिळाली. साईने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आपली छाप पाडली होती. त्यामुळे त्याच्याकडून कसोटी सामन्यात मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्याचं पदार्पण निराशाजनक ठरलं.

साई सुदर्शनने केवळ चार चेंडूंमध्ये शून्यावर बाद होत आपला पहिला डाव संपवला. इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू बेन स्टोक्स गोलंदाजीस आला असताना, साईने लेगसाईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या बॅटला लागून थेट विकेटकीपर जेमी स्मिथच्या हातात गेला आणि त्याला झेलबाद व्हावे लागले.

या शून्यावर बाद झाल्यामुळे साईचं नाव आता अशा काही दिग्गज खेळाडूंमध्ये सामील झालं आहे, ज्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात “डकने” म्हणजेच शून्यावर बाद होऊन केली होती. या यादीत सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, सुरेश रैना, व्हीव्हीएस लक्ष्मण, शिखर धवन आणि केएल राहुल यांसारख्या नावांचा समावेश आहे.

पदार्पणात शून्य धावा करणारे खेळाडू

सचिन तेंडुलकर
महेंद्रसिंग धोनी
सुरेश रैना
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण
शिखर धवन
के.एल. राहुल
साई सुदर्शन

साई सुदर्शन हा भारताकडून पहिल्या कसोटी डावात शून्यावर बाद होणारा 29वा खेळाडू ठरला आहे. तर वर्ष 2000 नंतर तो सहावा भारतीय फलंदाज आहे ज्याला अशी सुरुवात झाली. शून्यावर बाद होणं ही केवळ आकड्यांची बाब आहे, साईकडे प्रतिभा आहे आणि त्याला पुढील डावांमध्ये चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी नक्कीच मिळेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---