इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी (२८ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण मुंबई इंडियन्स संघाला गेल्या ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पंजाब किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने अप्रतिम कामगिरी करत ६ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयानंतर कायरन पोलार्ड सामनावीर पुरस्कार देण्यात आला; तर पंजाब किंग्स संघातील खेळाडूंवर देखील बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला.
कायरन पोलार्ड –
मुंबई इंडियन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू कायरोन पोलार्ड याने पंजाब किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने ख्रिस गेल आणि केएल राहुलला बाद करत टी-२० क्रिकेटमध्ये ३०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला. यासह तो टी -२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारा आणि ३०० गडी बाद करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. पोलार्डने ५६५ व्या सामन्यात हा पराक्रम केला. २ गडी बाद करण्यासह त्याने ७ चेंडुंमध्ये १५ धावांची खेळी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
केएल राहुल –
तसेच पंजाब किंग्स संघाचा कर्णधार केएल राहुल याने ४५ धावांवर फलंदाजी करत असलेल्या सौरभ तिवारीचा अप्रतिम झेल टिपला होता. ज्यामुळे त्याला ‘परफेक्ट कॅच ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. यासह त्याला एक लाख रुपये देण्यात आले.
एडेन मार्करम –
पंजाब किंग्स संघाचा विस्फोटक फलंदाज एडेन मार्करम याने तुफान फटकेबाजी केली. त्याने २९ चेंडूंमध्ये ४२ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ६ चौकार मारले होते. या खेळीच्या जोरावर त्याला ‘सफारी सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. यासह त्याला एक लाख रुपये देण्यात आले.
कायरन पोलार्ड –
मुंबई इंडियन्स संघ अडचणीत असताना कायरन पोलार्डने १ चौकार आणि १ षटकार मारत मुंबई इंडियन्स संघाला पुनरागमन करून दिले होते. या खेळीच्या जोरावर त्याला ‘ड्रीम ईलेव्हेन गेम चेंजर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. यासह त्याला एक लाखांचा पुरस्कार देण्यात आला.
सौरभ तिवारी –
मुंबई इंडियन्स संघाकडून धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सौरभ तिवारीने ४५ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळी दरम्यान तिने ३ चौकार आणि २ गगनचुंबी षटकार मारले होते. या षटकारासह त्याला ‘क्रॅक इट सिक्स’चा पुरस्कार देण्यात आला. यासह त्याला एक लाखांचा पुरस्कार देण्यात आला होता.
रवी बिश्नोई –
पावरप्लेच्या षटकात पंजाब किंग्स संघाकडून अप्रतिम कामगिरी करणाऱ्या रवी बिश्नोईला ‘पावरप्ले ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. रवी विश्र्नोईने पावरप्लेच्या षटकात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना एकापाठोपाठ एक चेंडूंवर बाद करत माघारी धाडले होते. पुरस्कारासह त्याला एक लाख रुपये देण्यात आले.
जसप्रीत बुमराह –
तसेच या सामन्यात दोन गडी बाद करणाऱ्या जसप्रीत बुमराहला ‘मोस्ट वॅल्युएबल ऐसेट ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. यासह त्याला एक लाख रुपये देखील देण्यात आले.
महत्वाच्या बातम्या-
‘शमीची कृपा, त्याच्यामुळेच मी फॉर्मात परतलो’, हार्दिकने प्रतिस्पर्धी खेळाडूला दिले श्रेय
बीसीसीआयने आयपीएल २०२१च्या वेळापत्रकात बदल करण्यामागे आहे ‘रहाणे कनेक्शन’?, घ्या जाणून
दिल्लीच्या पराभवाने विजयी मुंबईला धक्का, टॉप-४ मध्ये उडी घेण्याची हुकली संधी; पाहा अपडेटेड गुणतालिका






