2025चा आयपीएल हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या हंगामातील फायनल सामन्याचा मंच सज्ज झाला आहे. (IPL 2025 Final) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात मंगळवारी (3 जून) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महामुकाबला खेळला जाणार आहे. (RCB vs PBKS IPL Final 2025) या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे.
आरसीबी आणि पंजाब या दोन्ही संघांनी स्पर्धेच्या सुरुवातीपासून भाग घेतला असला तरी, त्यांना अद्याप एकही आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नाही. त्यामुळे, दोन्ही संघांचे खेळाडू ही संधी साधून संघाच्या ऐतिहासिक विजयासाठी मैदानावर घाम गाळताना दिसतील. दरम्यान सर्वकाही पणाला लागलेले असताना, प्रत्येक खेळाडूला माहित आहे की ‘प्लेअर ऑफ द मॅच’ (Player of the Match) जिंकून ते आपले नाव इतिहासात कोरू शकतात. चला तर मग आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ सर्व खेळाडूंवर एक नजर टाकूया.
2008 – युसूफ पठाण (राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज) – 56 (39) आणि 3/22
2009 – अनिल कुंबळे (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध डेक्कन चार्जर्स) – 4/16
2010– सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स) – 57 (35) आणि 1/21
2011– मुरली विजय (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) – 95 (52)
2012 – मनविंदर बिस्ला (कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज) – 89 (48)
2013 – किरॉन पोलार्ड (मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज) – 60* (32) आणि 1/34
2014 – मनीष पांडे (कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) – 94 (50)
2015 – रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज) – 50 (26)
2016 – बेन कटिंग (सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) – 39* (15) आणि 2/35
2017 – कृणाल पांड्या (मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंट) – 47 (38) आणि 0/31
2018 – शेन वॉटसन (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद) – 117* (57)
2019 – जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज) – 2/14
2020 – ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) – 3/30
2021 – फॅफ डु प्लेसिस (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स) – 86 (59)
2022 – हार्दिक पांड्या (गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स) – 34 (30) आणि 3/17
2023 – डेव्हॉन कॉनवे (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स) – 47 (25)
2024 – मिचेल स्टार्क (कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद) – 2/14
आरसीबीच्या सध्याच्या संघात असलेला कृणाल पांड्या हा एकमेव खेळाडू आहे ज्याने यापूर्वी हा पुरस्कार जिंकला आहे आणि तो
आयपीएल 2025च्या फायनल सामन्यात खेळणार आहे. आयपीएल 2025च्या फायनलचा स्टार कोण असेल? हे आपल्याला (3 जून) रोजी कळेल. दरम्यान आरसीबी आणि पंजाबमधील जो संघ ट्राॅफीवर आपले नाव कोरण्यात यशस्वी ठरेल, तो संघ आयपीलच्या इतिहासात आपले नाव कोरेल. (IPL History)






