---Advertisement---

राणाजी रॉक्स! रोहित आणि वॉटसननंतर अशी कामगिरी करणारा बनला केवळ तिसरा फलंदाज

On: रविवार, एप्रिल 11, 2021 9:51 PM
Nitish-Rana
---Advertisement---

आयपीएल २०२१ चा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नई येथील एमए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नितीश राणाने ८० धावांची लाजवाब खेळी केली. यासोबतच, त्याचा समावेश रोहित शर्मा व शेन वॉटसन या दिग्गजांच्या पंक्तीत झाला.

अशी कामगिरी करणारा तिसरा फलंदाज बनला राणा
नितीश राणाने हंगामातील या पहिल्या सामन्यात शुबमन गिलसोबत केकेआरसाठी डावाची सुरुवात केली. राणाने पहिल्याच सामन्यात आपल्या बॅटचे पाणी सनरायझर्सच्या गोलंदाजांना पाजले. त्याने ५६ चेंडूंचा सामना करताना ९ चौकार व ४ षटकारांचा सहाय्याने व १४३ च्या स्ट्राइक रेटने ८० धावांची धमाकेदार खेळी केली. यासोबतच त्याने रोहित शर्मा व शेन वॉटसन या दोन दिग्गज फलंदाजांच्या रांगेत स्थान मिळवले.

राणा हा रोहित आणि वॉटसन यांच्यानंतर एक ते पाच या सर्व क्रमांकावर खेळून अर्धशतके ठोकणारा केवळ तिसरा फलंदाज बनला. रोहितने डेक्कन चार्जर्स व मुंबई इंडियन्स तर, शेन वॉटसनने राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व चेन्नई सुपर किंग्स यांच्यासाठी ही कामगिरी बजावली होती. राणाने आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

अशी राहिली आहे कारकीर्द
मागील चार हंगामापासून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग असलेला राणा २०१६ व २०१७ आयपीएलमध्ये प्रथम मुंबई इंडियन्ससाठी खेळला होता. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ६१ सामने खेळताना १५१७ धावा बनविल्या आहेत. यामध्ये त्याने १२ अर्धशतक ठोकली आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १३५ चा राहिला आहे. राणा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करतो. काही काळ त्याने दिल्लीचे कर्णधारपद देखील भूषवले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

एमएस धोनी यंदा खेळतोय अखेरची आयपीएल? ‘या’ गोष्टीमुळे मिळत आहेत संकेत

हे आहेत सनरायझर्सचे ‘जबरा फॅन’, वॉर्नरने शेअर केली छायाचित्रे

जमाईका टू इंडिया! आयपीएलदरम्यान ख्रिस गेलचे रॅप साँग झाले प्रदर्शित, इंटरनेटवर व्हिडिओ घालतोय धुमाकूळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---