भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये नक्कीच बदल घडवताना दिसला आहे. भारतीय संघाने या फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, यष्टीरक्षक फलंदाज ‘संजू सॅमसन’ने (Sanju Samson) आपले खास स्थान संघात निर्माण केले आहे. या स्टार उजव्या हाताच्या फलंदाजाने या फॉरमॅटमध्ये फलंदाज म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 3 सर्वात मोठ्या भागीदारीबद्दल जाणून घेऊया, ज्यामध्ये संजू सॅमसनचा भाग आहे.
1) संजू सॅमसन आणि तिलक वर्मा- 210*- टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी एक अप्रतिम भागीदारी पाहायला मिळाली आहे. ज्यामध्ये संजू सॅमसन एक भाग होता. या स्टार यष्टीरक्षक फलंदाजासोबत युवा फलंदाज तिलक वर्माने विक्रमी भागीदारी करत 210 नाबाद धावा जोडल्या. गेल्या वर्षी जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ही मोठी भागीदारी रचली होती.
2) संजू सॅमसन आणि दीपक हुडा- 176 धावा- भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने 2022 साली आयर्लंडविरूद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मोठी भागीदारी केली होती. डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात संजू सॅमसनने भारतीय फलंदाज दीपक हुडासोबत दुसऱ्या विकेटसाठी 176 धावांची भागीदारी रचली होती. या भागीदारीत संजूचे योगदान 42 चेंडूत 77 धावांचे होते, तर दीपक हुडाने शानदार शतक झळकावले होते.
3) संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव- 173 धावा- भारतीय संघासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी भागीदारी गेल्या वर्षी संजू सॅमसन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात झाली. संजू सॅमसनने 2024 मध्ये बांगलादेशविरूद्ध खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यात शानदार खेळी केली होती. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 173 धावांची भागीदारी रचली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; दुसऱ्या दिवशी 15 विकेट्स पडल्यानंतर भडकले गावसकर! म्हणाले, “आम्ही रडणारे…”
रिषभ पंतच्या विस्फोटक खेळीने हैराण… पाहा काय म्हणाले कांगारू प्रशिक्षक
धनश्रीसोबत घटस्फोट झाला, तर चहलला किती प्रॉपर्टी द्यावी लागेल?