---Advertisement---

दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत कानपूर कसोटीसाठी ‘अशी’ असू शकते टीम इंडियाची ‘प्लेइंग इलेव्हन’

On: बुधवार, नोव्हेंबर 24, 2021 2:54 PM
---Advertisement---

न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली होती. या मालिकेत भारतीय संघाने ३-० ने विजय मिळवला होता. आता हे दोन्ही संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमने-सामने येणार आहेत. मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबर रोजी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर रंगणार आहे.

या सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेच्या हाती देण्यात आले आहे, तर केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर झाला असून संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे आणि राहुल द्रविड यांच्यासाठी प्लेइंग इलेव्हेनमध्ये कुठल्या खेळाडूला स्थान द्यावे, हे निश्चित करणे कठीण जाऊ शकते. चला तर पाहूया कशी असू शकते पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची संभावित प्लेइंग इलेव्हेन.

सलामीवीर फलंदाज 
या सामन्यात शुबमन गिल आणि मयांक अगरवाल हे दोघे डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. केएल राहुल आणि रोहित शर्मा यांचा अनुपस्थितीत या दोघांना ही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.यापूर्वी केएल राहुल आणि मयांक अगरवाल हे दोघेही डावाची सुरुवात करणार होते. परंतु केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. तसेच रोहित शर्माला सध्या विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे मयांक अगरवाल आणि शुबमन गिल यांच्यावर संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असणार आहे.

मध्यक्रमात या फलंदाजांना मिळू शकते संधी 
विराट कोहली कानपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर हे दोन पर्याय आहेत. तरी, सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्रेयस अय्यरलाच अंतिम ११ मध्ये आधी संधी दिली जाईल, असे संकेत रहाणेने दिले आहेत. त्यामुळे श्रेयस अय्यरला कसोटी पदार्पण करता येणार आहे.

कर्णधार आणि यष्टिरक्षक
पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे फलंदाजी करण्यासाठी येईल. त्याने संघाचा नियमित उपकर्णधार आहे. परंतु, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याला पहिल्या कसोटीसाठी कर्णधाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ५ कसोटी सामन्यात भारतीय संघाला ४ वेळेस विजय मिळवून दिला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला होता.

याशिवाय या कसोटी मालिकेत रिषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी वृद्धीमान साहाला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळवले जाऊ शकते.

अष्टपैलू खेळाडू आणि फिरकीपटू
कानपूर कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे अक्षर पटेल, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या ३ गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. याचे प्रमुख कारण म्हणजे हे तिघे उत्कृष्ट गोलंदाजच नव्हे, तर चांगली फलंदाजी देखील करु शकतात. रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तर आर अश्विनच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ३ शतकांची नोंद आहे. मार्च महिन्यात इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत अक्षर पटेलने देखील दाखवून दिले होते की, तो काय काय करू शकतो.

वेगवान गोलंदाज 
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीचा मोर्चा सांभाळण्याची जबाबदारी ईशांत शर्मा आणि उमेश यादवला दिली जाऊ शकते. १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या ईशांत शर्माचा अनुभव भारतीय संघाच्या कामी येऊ शकतो. तर दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून उमेश यादवला स्थान दिले जाऊ शकते.

कानपूर कसोटीसाठी भारताची संभाविक प्लेइंग इलेव्हन –
शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, उमेश यादव.

महत्त्वाच्या बातम्या – 

हरमनप्रीत कौरने उंचावली कोट्यवधी भारतीयांची मान! बीबीएल स्पर्धेत पटकावला ‘मोठा’ पुरस्कार

केव्हा आणि कुठे सुरू होणार आयपीएल २०२२ स्पर्धा? मोठी अपटेड आली समोर

‘भारताची जुनी जर्सी पुन्हा आणायची वेळ आली’, वसीम जाफर यांचा अजब सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---