भारतीय क्रिकेट संघ यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकाची कसून तयारी करत आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड संघबांधणीची तयारी करत आहे. यासाठी बोर्ड संघासाठी अधिकाधिक टी२० मालिका खेळवत असून खेळाडूंच्या फलंदाजीचा क्रमही बदलून पाहत आहे. यावरूनच विकेटकिपर-फलंदाज दिनेश कार्तिकच्या मते वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्याचा भारताला टी२० विश्वचषकात फायदा होईल, असे मत मांडले आहे.
भारत वेस्ट इंडिज विरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. त्यातील तीन सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले तर बाकी दोन सामने फ्लोरिडा येथे खेळले जाणार आहेत. भारताने पहिले तिन्ही सामने विभिन्न परिस्थितीत खेळले आहेत. तर चौथा सामना शनिवारी (६ ऑगस्ट) खेळला जाणार आहे. या सामन्याआधी दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) म्हणाला, “मी जेव्हा विश्वचषकाचा विचार करतो, तेव्हा माझ्या डोक्यात तीन मैदाने येतात. त्यात सिडनीचे मैदान अंडाकृती असून तेथील सरळ सीमारेषांचे अंतर अधिक असून मोठी तर बाजूच्या सीमारेषा छोट्या आहेत.”
“ऍडलेडचे मैदान कसे आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. तेथे बाजूच्या सीमारेषा छोट्या आहेत आणि सरळ सीमारेषेचे अंतर मोठे असून ती लांब आहे. तर मेलबर्नचे मैदान याच्या विरुद्ध आहे,” असेही कार्तिकने पुढे म्हटले आहे.
रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी ही मालिका सुरू होण्यापूर्वी आम्हाला पूर्वसुचना दिली होती, असे सांगताना कार्तिक म्हणाला, “आम्ही जेथे खेळणार आहोत तेथे वेगवेगळ्या परिस्थिती असणार आहेत. यामुळे आव्हानही वेगळे असणार आहेत. तसेच आम्ही जेथे खेळलो तेथे आमच्यासमोर वेगळी आव्हाने होती. त्यामुळे जेव्हा तुम्हाला संधी मिळली त्याबरोबर काही आव्हानेही असतात. अशावेळी आपल्यावर दबावही असतो. माझ्यामते आम्ही वेस्ट इंडिजमध्ये चांगला खेळ केला आहे.”
भारताने याआधी इंग्लंड विरुद्ध टी२० मालिका खेळली आहे. तेथे भारताने यजमान संघाला २-१ असे पराभूत केले होते. मागील काही सामन्यात दिनेशने फिनिशरची भुमिका योग्यरित्या पार पाडली आहे. त्याने भारतीय संघात पुनरागमन करत काही सामन्यांमध्ये विजयी खेळी केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही तुमचं बघा!’, सुनील गावसकरांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडवर साधलाय निशाणा
VIDEO: पाच महिन्यांपासून टीम इंडिया बाहेर असलेला ऑलराऊंडर कमबॅकसाठी सज्ज
बीबीएल संपवण्यासाठी षडयंत्र? यूएई टी-२० लीग खेळण्यासाठी ऑसी प्लेयर्सला मिळणार कोट्यवधी