आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुजरात आणि पंजाब किंग्स या संघांनी प्लेऑफ मध्ये त्यांचे स्थान निश्चित केले आहे. आता प्लेऑफमध्ये चौथी पोहोचणारी टीम कोणती असेल? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दावेदार आहेत. दोन्ही संघांचे दोन-दोन सामने उरले आहेत आणि दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हे सामने जिंकावे लागतील. दोन्ही संघांमध्ये सामना 21 मे रोजी वानखेडे स्टेडियम मध्ये होणार आहे.
सध्या 12 सामन्यानंतर मुंबईचे 14 गुण आहेत तसेच मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे, दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचे 13 गुण आहेत. ती पाचव्या स्थानावर आहे. दोन्ही सामने जिंकले तर ते सहज क्वालिफाय करू शकतात. हेच समीकरण मुंबईचे देखील आहे, याशिवाय या दोन्ही संघांना त्यांचा शेवटचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध खेळायचा आहे.
मुंबईसाठी एक सकारात्मक गोष्ट समोर येत आहे, जर मुंबईने एक सामना जिंकला आणि एक गमावला तरी सुद्धा संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय करू शकेल. जर दिल्लीने एक सामना जिंकला आणि एक गमावला तर दिल्ली प्लेऑफमधून बाहेर होईल. दुसरीकडे मुंबई इंडियन्स दिल्ली कडून 21 मे रोजी पराभूत झाली तर त्यांचा प्रयत्न पंजाब किंग्सला हरवून प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा असेल.
दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा शेवटचा सामना 18 मे रोजी गुजरात विरुद्ध खेळला होता. या सामन्यात दिल्लीला 10 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात केएल राहुलने शतक झळकावले होते. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कारण गुजरातसाठी साई सुदर्शन आणि कर्णधार गिलने शानदार प्रदर्शन केले होते.






