अखेर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बायोबबलमध्ये असून देखील खेळाडू व संघ व्यवस्थापनातील सदस्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत होता. त्यामुळे हा हंगाम स्थगित करण्यात आला आहे. या दरम्यानच ऑस्ट्रेलिया व सनरायजर्स हैदराबाद संघातील स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियावर आपल्या लहान मुलीने लिहिलेला संदेश शेयर केला आहे.
वॉर्नरच्या मुलीने त्याच्यासाठी एक छोटेसे पत्र लिहिले होते. या मध्ये तिने लिहिले ,”प्लीज डॅडी थेट घरी या. आम्हा सर्वांना तुमची फार आठवण येत आहे आणि आम्ही सर्व तुमच्यावर फार प्रेम करतो. इवी, इंडी आणि आयलाकडून तुम्हाला खूप सारं प्रेम.” या पत्राबरोबर वॉर्नरच्या मुलीने त्याच्या कुटुंबाचे एक चित्रही काढले आहे. वॉर्नरला इवी, इंडी आणि आयला अशा तीन मुली आहेत.
वॉर्नरने या पत्राचा फोटो शेयर करत लिहिले, “माझी प्रिय इवी तुला खूप सारं प्रेम”. वॉर्नरने हे पत्र शेयर करताच ते वाऱ्याचे वेगाने सोशल मीडियात वायरल झाले. अनेकांनी या फोटोवर भावनिक कमेंट्स देखील केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/COckwierDzF/
वॉर्नरच्या कामगिरीचा विचार केला असता त्याच्यासाठी आयपीएल 2021 स्पर्धा एखाद्या वाईट स्वप्नासारखी ठरली. आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या वॉर्नरला हैदराबाद संघाने कर्णधार पदावरून काढल्यानंतर त्याला अंतिम 11 जणांच्या संघातूनही बाहेर केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
दरम्यान, वॉर्नरच्या आयपीएलमधील एकूण कामगिरीचा विचार केला असता, तो खऱ्या अर्थाने हैदराबाद संघाचा एक आधारस्तंभ म्हणून गणला जातो. 2014 पासून हैदराबादच्या संघाचा नियमित सदस्य असलेल्या वॉर्नरने आपल्या नेतृत्वात 2016 साली हैदराबाद संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.
वॉर्नर हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक सातत्य राखणाऱ्या खेळाडूंमध्ये गणला जातो. त्याने 2015, 2017 व 2019 या तीन वर्षात ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा) पुरस्कार जिंकलेला आहे. त्याने आयपीएलमध्ये 148 सामन्यात 50 अर्धशतके आणि 4 शतकांसह 5447 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ स्थगित होताच सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट; आरसीबी झाली सर्वाधिक ट्रोल
घरी परत जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक ‘या’ देशात होणार रवाना?






