भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (६ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकापासून वंचित राहिलेल्या भारतीय महिला हॉकी संघाशी संवाद साधला. या दरम्यान अनेक खेळाडू रडू लागले. मात्र, पंतप्रधानांनी सर्वांचे सांत्वन केले. आपल्या झुंजार खेळाच्या बळावर उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला शुक्रवारी (०६ ऑगस्ट) कांस्य पदकाच्या प्ले-ऑफ सामन्यात ब्रिटनकडून पराभव पत्करावा लागला.
काय म्हणाले पंतप्रधान?
पराभवामुळे व्यथित झालेल्या भारतीय महिला खेळाडूंचा उत्साह वाढवताना पंतप्रधान म्हणाले, “तुम्ही सर्वांनी छान खेळ केला. मागील पाच-सहा वर्षांपासून तुम्ही खूप घाम गाळला आहे. खूप मेहनत घेतली. तुमचे कष्ट पदक आणू शकले नाहीत. मात्र, तुमचा घाम देशातील करोडो मुलींसाठी प्रेरणा बनला आहे. मी सर्व सहकाऱ्यांचे आणि प्रशिक्षकाचे अभिनंदन करतो आणि अजिबात निराश होऊ नका.”
पंतप्रधानांनी भारतीय संघातील दुखापतग्रस्त खेळाडू नवनीत कौरची विचारपूस केली. तसेच, वंदना कटारिया व सलीमा टेटे यांचे विशेष कौतुक केले.
खेळाडूंची केली सांत्वना
पंतप्रधानांनी भावूक झालेल्या खेळाडूंचे रडणे ऐकले तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही लोक रडणे थांबवा. मला आवाज येत आहे. अजिबात निराश होऊ नका. तुमच्या मेहनतीमुळे हॉकीचे पुनरुज्जीवन होत आहे.”
संभाषणादरम्यान प्रशिक्षक शोरेड मरिन यांनीही पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष संघाचे देखील अशाच प्रकारे संवाद साधून अभिनंदन केले होते.
#WATCH | Indian Women's hockey team breaks down during telephonic conversation with Prime Minister Narendra Modi. He appreciates them for their performance at #Tokyo2020 pic.twitter.com/n2eWP9Omzj
— ANI (@ANI) August 6, 2021
रोमांचक सामन्यात भारताला पहावा लागला पराभव
ऑलम्पिक इतिहासात प्रथमच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ब्रिटन संघाकडून ४-३ असा पराभव पत्करावा लागला. एकवेळ भारतीय संघ ३-२ असा आघाडीवर होता. मात्र, ब्रिटनच्या संघाने जबरदस्त पुनरागमन करत कांस्यपदक आपल्या नावे केले.
महत्त्वाच्या बातम्या-
शेवयपर्यंत चिवट झुंज देऊनही भारतीय महिला हॉकीपटूंचे स्वप्न धुळीस, भर मैदानात कोसळलं रडू