भारतीय संघाचा २०२०-२१ चा ऑस्ट्रेलिया दौरा काही दिवसांपुर्वी संपला. या दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना ब्रिस्बेन येथे पार पडला होता. या सामन्यात ३ विकेट्सने विजय मिळवत भारताने ही मालिका जिंकली. विशेष म्हणजे तब्बल ३२ वर्षांनंतर ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्यांदा पराभूत करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. यानंतर भारतीय संघाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करत मोदी यांनी लिहिले की, “या महिन्यात क्रिकेट क्षेत्रातून खूप चांगली बातमी मिळाली आहे. आपल्या क्रिकेट संघाने सुरुवातीला आलेल्या समस्यांचा सामना केल्यानंतर दमदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. आपल्या खेळाडूंचे परिश्रम आणि त्यांची सांघिक कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे.”
स्वत: प्रधानमंत्री मोदींनी भारतीय संघाची प्रशंसा केल्याने प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यांचे आभार मानले आहेत. “तुमचे हे शब्द भारतीय संघाला अजून मजबूत बनण्यास मदत करतील. सोबतच दबावाखाली असताना आणि कठीण परिस्थितींवेळी आम्हाला अजून जास्त प्रेरणा मिळेल,” असे शास्त्रींनी म्हटले आहे.
Thank you, Sir. Your kind words will further strengthen #TeamIndia and 🇮🇳’s resolve to perform under pressure and in trying circumstances. Jai Hind ! https://t.co/yQQN9nh8Ab
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) January 31, 2021
फेब्रुवारीत सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका
ऑस्ट्रेलिया दौरा आटोपून आता भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी, वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दौऱ्याची सुरुवात ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याने होणार आहे. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना १२ फेब्रुवारीपासून चेन्नईतच खेळविण्यात येणार आहे. तर अखेरचे दोन सामने अहमदाबादच्या नवीन मोटेरा मैदानावर खेळवले जातील.
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीच्या विचाराने इंग्लंडच्या खेळाडूला फुटला घाम; म्हणाला, “आम्ही त्याला आऊट करायचं तरी कसं?”
भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेत कोणत्या संघाचे पारडे जड? इयान चॅपेल यांनी वर्तवला अंदाज
टी१० लीगमध्ये तिसरा दिवशी ठरला रोमांचक, ‘या’ संघांनी साजरे केले विजय