भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या धारदार यॉर्कर चेंडूंसाठी ओळखला जातो. जसप्रीत बुमराहची गोलंदाजी शैली काहीशी वेगळी आहे. त्यामुळे त्याचा सामना करणे भल्याभल्या फलंदाजांचा अवघड जाते. परंतु, बुमराह सध्या दुसऱ्या कारणासाठी चर्चेत आहे. भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या गोलंदाजीची नक्कल करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ काही दिवस जुना असला, तरी बीसीसीआयने तो आपल्या ट्विटर खात्यावरून शनिवारी शेअर केला. त्यानंतर, आता या व्हिडिओवर अनिल कुंबळे यांची प्रतिक्रिया आली आहे.
बीसीसीआयने शेअर केला होता व्हिडिओ
शनिवारी (३० जानेवारी) बीसीसीआयने सार्वजनिक केलेल्या या व्हिडिओमध्ये जसप्रीत बुमराह भारताचे दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे यांच्या गोलंदाजी शैलीची नक्कल करताना दिसत आहे. बीसीसीआयने या व्हिडिओसह ट्विट करताना लिहिले की, ”जसप्रीत बुमराहचे तिखट यॉर्कर आणि वेगवान बाउन्सर आपण सर्वांनी पाहिले आहेत. या वेगवान गोलंदाजाचा हा कधीही न पाहिलेला अवतार आहे. बूमने अनिल कुंबळेंच्या गोलंदाजीच्या शैलीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला.”
अनिल कुंबळे यांनी दिली प्रतिक्रिया
बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओवर स्वत: अनिल कुंबळे यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली. कुंबळे यांनी म्हटले, “खूप छान केलं बुमराह, खरंच सुंदर. तू पुढील पिढीसाठी प्रेरणादायक आहेस. तुझ्या शैलीचे सर्वजण अनुकरण करत असतात. आगामी मालिकेसाठी खूप शुभेच्छा.”
भारताचे माजी कर्णधार राहिले आहेत कुंबळे
अनिल कुंबळे हे भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम मॅ विनर खेळाडूंपैकी एक आहेत. कुंबळे यांनी १३२ कसोटी सामन्यात ६१९ बळी मिळवले आहेत. विशेष म्हणजे एका डावात १० गडी बाद करण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावे आहे. हा विक्रम त्यांनी १९९९ साली पाकिस्तान विरुद्ध केलेला होता. तसेच, काही काळ त्यांनी भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व देखील केले होते.
महत्वाच्या बातम्या:
भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेत कोणत्या संघाचे पारडे जड? इयान चॅपेल यांनी वर्तवला अंदाज
वानखेडे स्टेडियमवर ९ मार्चला सुनील गावसकर यांचा होणार खास सन्मान? कारणही आहे तसंच विशेष
केवळ एक सामनावीर अन् विराट कोहली टाकेल तब्बल ५ दिग्गजांना मागे






