आज (15 ऑगस्ट) रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. ज्यामध्ये त्यांनी क्रीडा क्षेत्राबद्दलही भाष्य केले. या वेळी त्यांनी एक स्वप्न व्यक्त केले. लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणादरम्यान भारत 2036 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याचे त्यांचे स्वप्न असल्याचे सांगितले. ते म्हणाले की भारत आता ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धांचे यजमानपद भूषवण्यास तयार आहे.
पीएम मोदी म्हणाले, “जी-20 शिखर परिषदेचे आयोजन करून भारताने दाखवून दिले आहे की आपला देश मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करू शकतो. आज ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवणारे खेळाडू आपल्यासोबत आहेत. 140 कोटी भारतीयांच्या वतीने मी सर्वांचे अभिनंदन करतो. काही दिवसांनी पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय संघ रवाना होईल, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.
2036 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद हे भारताचे स्वप्न आहे आणि त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याच महिन्यात क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनीही लोकसभेत सांगितले होते की, भारत ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. खरे तर, ऑलिम्पिक खेळांचे आयोजन कोणाला करायचे हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ठरवते. 2028 ऑलिम्पिकचे यजमानपद अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहराकडे सोपवण्यात आले आहे. तर 2032 ची ऑलिम्पिक स्पर्धा ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे होणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय संघाला 6 पदके मिळाली. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी 5 कांस्य तर 1 राैप्य पदकांची कमाई केली. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तुल मध्ये तिसरे स्थान पटकावत भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिले पदक मिळवून दिले. यांसह भारतीय पुरुष हाॅकी संघ, कुस्तीमध्ये अमन सेहरावत, 25 मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये स्वप्निल कुसळे, 25 मीटर एअर पिस्तुल मिश्र संघांत मून भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी कांस्य पदक पटकावले, तर नीरज चोप्राने भालाफेकमध्ये राैप्य पदकाची कमाई केली.
हेही वाचा-
सीएसकेच्या स्टार खेळाडूने केंद्रीय करार नाकारला, टी20 लीगला दिले प्राधान्य; मुख्य संघाला मोठा धक्का
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने फडकवला तिरंगा, पत्नी मुलींसह अनोख्या पद्धतीने केला स्वातंत्र्य दिन साजरा
टीम इंडियाचा सर्वात मोठा फिनिशर, 54 ची सरासरी, तरी ही दुलीप ट्राॅफीतून वगळले! या खेळाडूची प्रतिभा धूळखात?