टी20 विश्वचषक 2024 मध्ये, आज शनिवार (22 जून रोजी) भारत आणि बांग्लादेश संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या. दोघांमधील हा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. स्थानिक वेळेनुसार हा सामना सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. मात्र, भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामना सुरू होईल. त्याआधी या सामन्यावर पीएम मोदी काय म्हणाले ते जाणून घेऊया.
एका कार्यक्रमात बोलताना पीएम मोदी म्हणाले, “मी आज संध्याकाळी क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यासाठी दोन्ही संघांना माझ्या शुभेच्छा देतो.” पंतप्रधान पुढे म्हणाले, “बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा विकास भागीदार आहे आणि आम्ही बांगलादेशसोबतच्या आमच्या संबंधांना सर्वोच्च प्राधान्य देतो.”
View this post on Instagram
भारत आणि बांग्लादेश यांच्यात होणारा सामना हा या स्पर्धेतील 47 वा सामना असेल. हा सुपर-8 मधील दोन्ही संघाचा दुसरा सामना आहे. याआधी भारत आणि बांग्लादेशच्या संघांनी सुपर-8 मध्ये प्रत्येकी एक सामना खेळला आहे. भारताने सुपर-8 मधला पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता, ज्यात भारताने 47 धावांनी विजय मिळवला होता. त्याचवेळी बांग्लादेशने सुपर-8 मध्ये पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्यांना डकवर्थ लुईस नियमानुसार 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
टी20 विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत एकूण चार सामने खेळले आहेत. संघाने ग्रुप स्टेजमध्ये आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकाविरुद्ध तीन सामने खेळले. कॅनडाविरुद्धचा चौथा सामना पावसामुळे रद्द झाला. संघाने आयर्लंडविरुद्ध 8 विकेट्सने, पाकिस्तानविरुद्ध 06 धावांनी आणि अमेरिकेविरुद्ध 7 गडी राखून विजय मिळवला. यानंतर टीम इंडियाने सुपर-8मध्ये अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय मिळवला.
महत्तवाच्या बातम्या-
आश्चर्यकारक! 15 ओव्हरमध्ये दिला केवळ 1 षटकार, फलंदाजांसाठी बुमराह घातक
“कर्णधारपद तर सोडा बाबर आझम एकदिवसीय आणि टी20 साठी योग्य नाही” माजी क्रिकेटरने लगावला टोला
टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूचे बांग्लादेशविरुद्ध आकडे शानदार, रोहित शर्मा संघात संधी देणार का?