---Advertisement---

पीएमडीटीए सोलिंको रोहित शिंदे टेनिस स्पर्धेत श्रावी देवरे, पृथ्वीराज दुधाणे यांना विजेतेपद

On: सोमवार, ऑक्टोबर 17, 2022 3:13 PM
---Advertisement---

रोहित शिंदे टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे  पीएमडीटीए-केपीआयटी- सोलिंको रोहित शिंदे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरीज स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित श्रावी देवरे तर मुलांच्या गटात पाचव्या मानांकीत पृथ्वीराज दुधाणे यांनी विजेतेपद पटकावले.

रोहित शिंदे टेनिस अकादमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षांखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित श्रावी देवरेने प्रार्थना खेडकरचा 4-1, 4-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. श्रावी सिंहगड स्प्रिंगडेल शाळेत शिकत असून, महाराष्ट्र मंडळ टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक धरणीधर मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मुलांच्या गटात संघर्षपूर्ण लढतीत पाचव्या मानांकित पृथ्वीराज दुधाणे याने चौदाव्या मानांकित आश्रित मज्जी याचा 4-1, 4-3(7-1), 4-2 असा टायब्रेकमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. पृथ्वीराज ट्री हाऊस शाळेत शिकत असून रेहित शिंदे टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक रेहित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

स्पर्धेतील विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण रोहित शिंदे व स्पर्धा संचालक रोशन गर्दे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 12 वर्षांखालील मुली: अंतिम फेरी
श्रावी देवरे(1)वि.वि  प्रार्थना खेडकर 4-1, 4-1

मुले: उपांत्य फेरी
आश्रित मज्जी(14) वि.वि नील देसाई(4) 7-5
पृथ्वीराज दुधाणे(5) वि.वि तनिश पाटील(3) 7-3

अंतिम फेरी : पृथ्वीराज दुधाणे(5) वि.वि आश्रित मज्जी(14) 4-1, 4-3(7-1), 4-2

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने टिपला अविश्वसनीय झेल! क्षणार्धात पालटला सामना; पाहा थक्क करणारा व्हिडिओ
भाजप नेते आशिष शेलार सांभाळणार बीसीसीआयचा खजिना! नवे खजिनदार म्हणून झाली बिनविरोध निवड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---