पुणे: महाराष्ट्र राज्य टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी पुण्यातील 12 खेळाडूंची निवड करण्यात आली असून हे खेळाडू या स्पर्धेत शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
गतवर्षी जिल्हास्तरीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतून या खेळाडूंची निवड करण्यात आली. कोविडमुळे या राज्यस्तरीय स्पर्धा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. आता या स्पर्धेस सुरुवात होत असून यामध्ये आपले खेळाडू लक्षवेधी कामगिरी करून विजेतेपद पटकावतील, अशी आशा असल्याचे पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी सांगितले. कोल्हापूर येथे दि.4 व 5 एप्रिल रोजी होणाऱ्या 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अभिराम निलाखे, विश्वजीत सणस, श्रावणी देशमुख आणि रिशीता पाटील हे खेळाडू पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
तसेच, नाशिक येथे दि.9 व 10 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या 17 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी दक्ष अगरवाल, साहिल तांबट, रिया भोसले आणि रमा शहापूरकर हे खेळाडू शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तर, नांदेड येथील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरी व दुहेरी निशित रहाणे, अर्जुन गोहड नेतृत्व करणार आहेत. सोलापूर येथे दि.9 व 10 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या महिला अजिंक्यपद स्पर्धेत अनिशा शेवटे, तन्वी तावडे शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या १५व्या हंगामात ‘या’ अँकर्स वेधणार साऱ्यांचे लक्ष, यादीत बुमराहची पत्नीही सामील
फाफ डू प्लेसिस गेल्याने उमदा सलामीवीराच्या शोधात आहे सीएसके, ‘हे’ दोघे घेऊ शकतात जागा
Video: अन् कॅमेराला पाहून चालू सामन्यात चिडला स्टीव्ह स्मिथ, पाहा नक्की झालं तरी काय