---Advertisement---

पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये चार भारतीय खेळाडूंचा समावेश

On: रविवार, फेब्रुवारी 22, 2026 7:27 PM
---Advertisement---

पुणे, २० फेब्रुवारी २०२६ : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र सरकार, पीएमसी, पीसीएमसी आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत भारताच्या एस डी प्रज्वल देव, दिग्विजयप्रताप सिंग यांसह रशियाच्या एगोर अगाफोनोव, मलेशियाच्या मित्सुकी वेई कांग लिओंग यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पुरुष गटात पहिल्या फेरीत भारताच्या एस डी प्रज्वल देव याने स्वित्झर्लंडच्या पाचव्या मानांकित लुका कॅस्टेलनुओवोचा 6-3, 6-4 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. भारताच्या दिग्विजयप्रताप सिंग याने बाराव्या मानांकित मुकुंद ससीकुमारचा टायब्रेकमध्ये 7-5, 7-6(1) असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला.

रशियाच्या एगोर अगाफोनोव याने नवव्या मानांकित ऑस्ट्रियाच्या फिलिप सेकुलिकचा 7-6(2), 6-0 असा पराभव केला. मलेशियाच्या बिगर मानांकित मित्सुकी वेई कांग लिओंग याने कोरियाच्या चौथ्या मानांकित ह्यॉन चुंगचा 6-3, 1-6, 6-0 असा तीन सेटमध्ये पराभव केला. जपानच्या सातव्या मानांकीत ताकुया कुमासाका याने भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या सिद्धार्थ रावतचे आव्हान 6-4, 6-4 असे मोडीत काढले. जपानच्या दहाव्या मानांकित युसुके ताकाहाशी याने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या सिद्धांत बांठियाचा 7-6(2), 6-4 असा पराभव केला.

स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये डेव्हिस कूपर भारताचा अव्वल टेनिस पटू सुमित नागल हा भारताचे नेतृत्व करणार असून एमएसएलटीएच्या वतीने 18 वर्षीय व जागतिक क्रमवारीत 488व्या स्थानी असलेल्या मानस धामणे, 22 वर्षीय व जागतिक क्र. 431 असलेल्या करण सिंग, 23वर्षीय महाराष्ट्राचा टेनिसपटू आदित्य बलसेकर यांना एकेरीत वाईल्ड कार्ड द्वारे थेट प्रवेश देण्यात आला आहे.

पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत 107000डॉलर(1कोटी रुपये) पारितोषिक रक्कम देण्यात येणार आहे. यामध्ये एकेरीतील विजेत्या खेळाडूला 75एटीपी गुण 17000डॉलर(15लाख 50हजार रुपये) , उपविजेत्या खेळाडूला 44 एटीपी गुण व डॉलर 9600 (9लाख रुपये), तर उपांत्य फेरीतील खेळाडूला 22गुण 5510डॉलर(5लाख रुपये), उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूला 12गुण व डॉलर3095(3लाख रुपये), उप उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूस 6गुण व डॉलर1740(1लाख 50हजार रुपये) , आणि पहिल्या फेरीतील खेळाडूला डॉलर 1045 (रु.95000) देण्यात येणार आहे.

निकाल: पहिली पात्रता फेरी: पुरुष:
ताकुया कुमासाका7वि.वि.सिद्धार्थ रावत(भारत) 6-4, 6-4;
दिग्विजयप्रताप सिंग(भारत)वि.वि. मुकुंद ससीकुमार127-5, 7-6(1);
तुंग-लिन वू2 वि.वि.कोकोरो इसोमुरा(जपान)6-1, 6-4;
एस डी प्रज्वल देव(भारत)वि.वि.लुका कॅस्टेलनुओवो 56-3, 6-4;
मॅक्स कास्निकोव्स्की1वि.वि.टिमोफेई डेरेपास्को 7-6(4), 6-2;
एगोर अगाफोनोव वि.वि.फिलिप सेकुलिक9 7-6(2), 6-0;
मासामिची इमामुरा11वि.वि.काहीर वारिक(भारत) 6-3, 6-0;
त्सुंग-हाओ हुआंग 8वि.वि.रियुकी मात्सुदा(जपान) 7-6(4), 6-3;
मित्सुकी वेई कांग लिओंग (मलेशिया)वि.वि.ह्यॉन चुंग 46-3, 1-6, 6-0;
युसुके ताकाहाशी 10वि.वि.सिद्धांत बांठिया(भारत)7-6(2), 6-4.

एकेरीतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
एकेरी: 1. फेडेरिको अगस्टिन गोमेझ(182, अर्जेंटिना), 2. जे क्लार्क(ग्रेट ब्रिटन,186), 3. इलिया सिमाकिन(214), 4. क्रॉफर्ड ऑलिव्हर(ग्रेट ब्रिटन, 215), 5. फ्रेडेरिको फेरेरा सिल्वा(प्रोतुगल,224), 6. सीना फेड्रिको(इटली, 225), 7. रिओ नोगुची(जपान, 250), 8. एडास बुटविलास(लिथुआनिया, 254);

दुहेरी: 1. सिद्धांत बांठिया(भारत)/अलेक्झांडर डोन्स्की(बल्गेरिया), 2. इसारो प्रुची(थायलंड)/कालियांदा पोनाचा(भारत), 3. युता शिमिझू/सीता वाटनाबे(जपान), 4. नाम जीसुंग/निकलास-साल्मिनेन पॅट्रिक(फिनलँड)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---