इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे तब्बल १६ सामने पार पडले आहेत. गुरुवार रोजी (२२ एप्रिल) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सोळावा सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात बेंगलोरने १६.३ षटकातच एकही विकेट न गमावता सहजपणे सामना खिशात घातला.
हा बेंगलोरचा या हंगामातील सलग चौथा विजय होता. यापुर्वी हंगामातील पहिल्याच लढतीत बलाढ्य मुंबई इंडियन्सला २ विकेट्सने पराभूत करत त्यांनी आयपीएल २०२१ चा शुभारंभ केला होता. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादला ६ धावा आणि कोलकाता नाईट रायडर्सला ३८ धावांनी पराभूत करत त्यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखली होती.
आता राजस्थानवर मात करत बेंगलरोने गुणतालिकेत पुन्हा अव्वलस्थानी उडी घेतली आहे. सर्वाधिक ८ गुणांची कमाई करत +१.००९ नेट रन रेटसह त्यांनी या स्थानावर ताबा मिळवला आहे. यापुर्वीही विजयाची हॅट्रिक पूर्ण करत त्यांनी अव्वल स्थान गाठले होते. परंतु एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्यांच्या मागील सामन्यात राजस्थानला पराभूत करत या स्थानावर झेप घेतली होती.
मात्र आता पुन्हा बेंगलोरने चेन्नईला पिछाडीवर टाकले आहे. ६ गुण आणि +१.१४२ नेट रन रेटसह चेन्नईची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. दिल्ली संघ +०.४२६ नेट रन रेट आणि ६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई ४ गुण व +०.१८७ नेट रन रेटमुळे चौथ्या स्थानावर आला आहे. याबरोबरच हंगामातील पहिला विजय नोंदवत सनरायझर्स हैदराबाद संघ टॉप-५ मध्ये जागा मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
उर्वरित कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. तर राजस्थान रॉयल्स संघ तळाशी आहे.
आयपीएल २०२१ मधील १२ व्या सामन्यानंतर अशी आहे गुणतालिका
१- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : (सामने ४, विजय ४, पराभव ०, गुण ०८, नेट रन रेट +१.००९)
२- चेन्नई सुपर किंग्ज : (सामने ४, विजय ३, पराभव १, गुण ०६, नेट रन रेट +१.१४२)
३- दिल्ली कॅपिटल्स : (सामने ४, विजय ३, पराभव १, गुण ०६, नेट रन रेट +०.४२६)
४- मुंबई इंडियन्स : (सामने ४, विजय २, पराभव २, गुण ०४, नेट रन रेट +०.१८७)
५- सनरायझर्स हैदराबाद : (सामने ४, विजय १, पराभव ३, गुण ०२, नेट रन रेट -०.२२८)
६- कोलकाता नाईट रायडर्स : (सामने ४, विजय १, पराभव ३, गुण ०२, नेट रन रेट -०.७००)
७- पंजाब किंग्ज : (सामने ४, विजय १, पराभव ३, गुण ०२, नेट रन रेट -०.८२४)
८- राजस्थान रॉयल्स : (सामने ४ विजय १, पराभव ३, गुण ०२, नेट रन रेट -१.००१)
महत्त्वाच्या बातम्या-
फक्त आरसीबी! आयपीएलमध्ये शतक करण्यात ‘विराट ब्रिगेड’ सर्वांच्या पुढे, नावे आहेत ‘इतक्या’ सेंचूरी
हर्षल पटलेचा रुद्रावतार, परागला बाद केल्यानंतर रागात तंबूत परतण्याचा केला इशारा; बघा व्हिडिओ
‘माझे शतक नव्हे संघाचा विजय महत्त्वाचा,’ सामनावीर पडीक्कलच्या वक्तव्याने जिंकली सर्वांचे मने






