दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (centurion) मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत ११३ धावांनी विजय मिळवला आहे. यासह ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. चला तर पाहूया या विजयानंतर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेची स्थिती. (Points table of world test championship after first test between South Africa vs India)
भारतीय संघाने (Indian team) विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या हंगामात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीत त्यांना न्यूझीलंड संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आता या स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ चौथ्या स्थानी कायम आहे. भारतीय संघाचे एकूण गुण ५४ आहेत तर विजयाची सरासरी ६४.२८ टक्के इतकी आहे. या यादीत पाकिस्तान संघ तिसऱ्या स्थानी आहे. कारण पाकिस्तान संघाच्या विजयाची सरासरी भारतीय संघाच्या विजयाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.
ऑस्ट्रेलिया संघ अव्वल स्थानी
ऑस्ट्रेलिया( Austrelia) आणि इंग्लंड (India) या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिका (Ashes series) सुरू आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने ३-० ची विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवताच ऑस्ट्रेलिया संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत आपली स्थिती आणखी मजबूत केली. १०० टक्के विजयाच्या सरासरीसह ऑस्ट्रेलिया संघ प्रथम स्थानी आहे. तर श्रीलंका संघ देखील १०० टक्के विजयाच्या सरारीसह दुसऱ्या स्थानी आहे.
The #WTC23 standings after India’s win in the first #SAvIND Test 👀 pic.twitter.com/rNyK8GKRgs
— ICC (@ICC) December 30, 2021
दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा जोरदार विजय
या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ३२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला अवघ्या १९७ धावा करण्यात यश आले होते. त्यानंतर भारतीय संघाला मोठी आघाडी मिळाली होती. ही आघाडी घेत, भारतीय संघाने दुसऱ्या डावात १७४ धावा केल्या होत्या. तसेच दक्षिण आफ्रिका संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३०५ धावांचे आव्हान दिले होते. परंतु दक्षिण आफ्रिका संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १९९ धावांवर संपुष्टात आला. हा सामना भारतीय संघाने ११३ धावांनी आपल्या नावावर केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
SAvsIND, 1st Test: भारताने रचला इतिहास, दक्षिण आफ्रिकेवर तब्बल ११३ धावांनी मिळवला दणदणीत विजय
काय सांगता? भज्जीने विराटला म्हटले होते दुसरी आई? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण
हे नक्की पाहा: