भारतीय क्रिकेटपटू दिपक चहरच्या मानस सरोवर कॉलनी, आग्रा येथील घरी 6 जणांकडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. पण दिपकच्या आईने प्रसंगावधान राखल्याने या 6 जणांना अटक करण्यात शहागंज पोलिसांना यश आले आहे.
हे सहाजण दिपकचे घर फोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्याची आई एकटीच घरी होती. या चोरट्यांनी सीसीटीव्हीची वायर कापली होती. पण काहीतरी विचित्र घडतय हे लक्षात येताच दिपकच्या आईने अलार्म वाजवला.
अटक झालेल्या या 6 आरोपींची नावे रुपकिशोर, राजकुमार, विजय कुशवाह, दशरत, दीनदयाळ आणि राकेश अशी आहेत. हे सहाही जण सराईत गुन्हेगार असून स्थानिक पोलिस त्यांच्या शोधात होते. त्यांच्यावर अनेक चोरींचे आरोप आहेत.
या सहाजणांवर आयपीसी कलम 412 च्या अंतर्गत मालमत्ता चोरीच्या प्रयत्नाचा आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी शस्त्र कायद्याअंतर्गत कलम 25 नुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
या टोळीबद्दल शहागंजचे स्थानिक पोलिस अधिकारी प्रेम निवास शर्मा यांनी सांगितले की ह्या आरोपींवर जवळजवळ 9 चोरींचे आणि घरफोडीचे आरोप आहेत.
या आरोपींकडून पोलिसांनी दोन पिस्तुल, एक अॅटो-रिक्षा, 5 मॉनिटर आणि चोरीची शस्त्रे जप्त केली आहेत.
या चोरीची चहरच्या कुटुंबाने कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही. चहरने मागील महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या एशिया कपमध्ये भारताच्या वनडे संघात पदार्पण केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किम्मत
–पुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर
–भारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
–