पुणे। ऑल स्टार्स, वॉरियर्स या संघांनी पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
पूना क्लबच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत ऑल स्टार्स संघाने किंग्ज संघावर पंधरा धावांनी मात केली. ऑल स्टार्स संघाने निर्धारित सहा षटकांत ४ बाद ५३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल किंग्ज संघाला २ बाद ३८ धावाच करता आल्या. दुसऱ्या लढतीत वॉरियर्स संघाने सेलर्स संघावर सहा धावांनी निसटता विजय मिळवला.
वॉरियर्स संघाने दिलेल्या ६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सेलर्स संघाला ३ बाद ५३ धावाच करता आल्या. तिसऱ्या लढतीत टायगर्स संघाने एका धावेने विजय मिळवून टायफून्सची घोडदौड रोखली. सलग चार विजयानंतर टायफून्स संघाला पराभव पत्करावा लागला. टायगर्स संघाने दिलेले ५९ धावांचे लक्ष्य गाठताना टायफून्स संघाला २ बाद ५७ धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक :
१) ऑल स्टार्स – ६ षटकांत ४ बाद ५३ (मेहुल २०, खलीद परवानी १०, प्रीतम लुणावत २-६, उमेश पिल्लई १-४) वि. वि. किंग्ज – ६ षटकांत २ बाद ३८ (आर्यमन पिल्लई १९, प्रियाग पटेल १-९, प्रोमीत सूद १-४ ).
२) वॉरियर्स – ६ षटकांत ४ बाद ५९ (आर्यन गाडगीळ २२, झियान तलब नाबाद २२, रोझेब भारदा १-७, सुमिरन मेहता १-१०) वि. वि. सेलर्स – ६ षटकांत ३ बाद ५३ (तारिक नाबाद २९, सुमिरन मेहता १७, आर्यन गाडगीळ १-५, विक्रांत परदेशी १-१४).
३) टायगर्स – ६ षटकांत बिनबाद ५८ (आदिश शहा नाबाद ३६, अर्जुन मोटाडू नाबाद १९) वि. वि. टायफून्स – ६ षटकांत २ बाद ५७ (अश्विन शहा नाबाद ३६, अमेय कुलकर्णी १-१०).
४) माव्हरिक्स – ६ षटकांत ६ बाद ४६ (रौनक ढोले पाटील २१, साहिल कवडे १०, रजित परदेशी २-८) पराभूत वि. जेट्स – ४.५ षटकांत बिनबाद ४९ (पुनीत सामंत नाबाद ३०, चिराग लुल्ला नाबाद १५).
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल सुरू होण्याआधी दिसला हार्दिक पांड्याचा नवा अवतार, बनला ‘बॉम्ब एक्सपर्ट’
विराट आणि ७१व्या शतकाच्या आड्यात येतंय ‘दुर्दैव’! चेंडू फिरल्यामुळे २३ धावांवर पायचीत
विश्वचषकात हरमनप्रीत कौर ठरली ‘सिक्सर क्वीन’; ‘इतके’ षटकार ठोकत गाठला पहिला क्रमांक