पुणे। माव्हरिक्स संघाने पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत जॅग्वार्स संघावर सहा गडी राखून मात केली. पूना क्लब क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. जॅग्वार्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित सहा षटकांत ५ बाद ५६ धावा केल्या. यात मनप्रीत उप्पलने १६ चेंडूंत २३ धावा केल्या. माव्हरिक्स संघाने विजयी लक्ष्य ५.३ षटकांत दोन गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात साहिल कावडेने ११ चेंडूंत १९, तर रौनक सागर ढोले-पाटीलने नऊ चेंडूंत तेरा धावा केल्या. तर तुषारने आठ चेंडूंत दोन चौकार व एका षटकारासह नाबाद १९ धावा केल्या.
अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत सेलर्स संघाने किंग्ज संघावर सहा गडी राखून मात केली. या स्पर्धेत किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित सहा षटकांत २ बाद ५७ धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना सेलर्स संघाला पहिल्या चार षटकांत १ बाद ३७ धावाच करता आल्या होत्या. यानंतर पाचव्या षटकात सुमिरन मेहता आणि झमीरने भार्गव पाठकच्या गोलंदाजीवर चौदा धावा वसूल केल्या. त्यामुळे सेलर्स संघाला अखेरच्या षटकात विजयासाठी सात धावांची गरज होती. यात पहिल्याच चेंडूवर झमीर दुसरी धाव घेताना धावबाद झाला. यानंतर अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना सुमिरन मेहताने फाइन लेगला चौकार ठोकून सेलर्सचा विजय साकारला. सुमिरन मेहताने १९ चेंडूंत नाबाद ३० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक :
१) जॅग्वार्स – ६ षटकांत ५ बाद ५६ (मनप्रीत उप्पल २३, राजेश बनसोडे १७, विजय सामंत १-११, हिरेन परमार १-६, किरण देशमुख १-१०) पराभूत वि. माव्हरिक्स – ५.३ षटकांत २ बाद ५८ (साहिल कावडे १९, तुषार नाबाद १९, रौनक सागर ढोले-पाटील १३, पिनाकिन मराठे १-८).- सामनावीर – रौनक ढोले पाटील
२) किंग्ज – ६ षटकांत २ बाद ५७ (आर्यमन पिल्लई ३५, उमेश पिल्लई नाबाद ११, सचिन डी. १-२) पराभूत वि. सेलर्स – ६ षटकांत २ बाद ६१ (सुमिरन मेहता नाबाद ३०, झमीर २४, सतीश मुंदडा १-७).
३) टायफून्स – ६ षटकांत ३ बाद ६१ (अश्विन शाह १८, अमन पारेख १६, क्रिश शाह नाबाद १४, ऋषी चैनानी १३, प्रकाश कारिया २-१३) वि. वि. ऑल स्टार्स – ६ षटकांत २ बाद ४२ (खलीद परवानी १९, प्रकाश कारिया १३, क्रिश शहा १-७). सामनावीर – क्रिश शाह
४) वेन्डकिन ईगल्स – ६ षटकांत १ बाद ७४ (अरुण खट्टर ४०, सिद्धान्त धर्मा नाबाद ३४) पराभूत वि. जेट्स – ५.५ षटकांत २ बाद ७९ (चिराग लुल्ला ४९, ऋषभ बजाज नाबाद १२, अमित के. १०, अरुण खट्टर १-२१).
५) जॅग्वार्स – ६ षटकांत १ बाद ५९ (सुशांत खोसला नाबाद २५, राजेश बनसोड २०, विक्रम काकडे १-८) पराभूत वि. टायगर्स – ५.४ षटकांत ४ बाद ६२ (आदिश शहा नाबाद २७, आदिल खान २२, विमल हंसराज १-३, युवराज गुलाटी १-९, सुशांत खोसला १-१०). सामनावीर – आदिश शहा
महत्त्वाच्या बातम्या –
PHOTOS: राजस्थान रॉयल्सने नव्या रंगात नव्या ढंगात केली सरावाला सुरूवात
शाकिब-बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या वादाचा निघाला ‘सुवर्णमध्य’; वाचा सविस्तर
VIDEO: पत्नी आणि मुलीसह अजिंक्य रमला बालपणीच्या आठवणींत; दिली शाळेला सदिच्छा भेट