---Advertisement---

असे काय झाले की खूद्द कर्णधार विराटनेच आरसीबीला विचारले काही मदत हवी का?

On: गुरूवार, फेब्रुवारी 13, 2020 12:55 PM
---Advertisement---

आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी) संघाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरचे प्रोफाईल पिच्चर, पोस्ट काढून टाकल्या आहेत. त्यामुळे अनेक चाहत्यांसह त्यांच्याच संघातील खेळाडूंनाही आश्चर्य वाटले आहे. या घटनेबद्दल खूद्द आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीलाही कोणतीही माहिती नसल्याचे त्याने ट्विट करत सांगितले आहे.

विराटने आरसीबीने प्रोफाईल पिच्चर, पोस्ट काढून टाकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करताना ट्विट केले आहे की ‘पोस्ट नाहिशा झाल्या आहेत आणि याबद्दल कर्णधारालाही काही माहिती नाही. आरसीबी काही मदत हवी असेल तर सांगा.’

https://twitter.com/imVkohli/status/1227792324161232897

आरसीबीने आयपीएल 2020 साठी टायटल स्पोन्सर्स म्हणून मुथूट फिनकॉर्पबरोबर मंगळवारी तीन वर्षांच्या कराराची घोषणा केली आहे. त्यानंतर आरसीबीच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरचे प्रोफाईल पिच्चर, पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत. यामागे आरसीबीचा लोगो आणि जर्सी बदलणार असल्याची शक्यता आले.

विराटच्याआधी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि आक्रमक फलंदाज एबी डिविलियर्स यांनीही आरसीबीने प्रोफाईल पिच्चर, पोस्ट काढून टाकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. चहलने ट्विट केले आहे की ‘अरे आरसीबी ही कसली गुगली आहे. तूमचे प्रोफाईल पिच्चर आणि इंस्टाग्राम पोस्ट कुठे गेले?’

तसेच डिविलियर्सने ट्विट केले आहे की ‘आरसीबी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सला काय झाले? मला आशा आहे की हा फक्त एक स्ट्रॅटर्जी ब्रेक असेल.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---