राजस्थान रॉयल्स संघाने रविवारी (दि. 16 एप्रिल) आयपीएल 2023च्या 23व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला 3 विकेट्सने पराभूत केले. राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार शिमरॉन हेटमायर ठरला. त्याने मैदानावर वादळी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्यानंतर हेटमायर ड्रेसिंग रूममध्येही मजेशीर अंदाजात दिसला. त्याने संघसहकाऱ्यांसोबत मजा-मस्ती केली, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाने शुबमन गिल (45) आणि डेविड मिलर (46) याच्या शानदार खेळीच्या जोरावर 7 विकेट्स गमावत 177 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. संघाचे दोन्ही सलामीवीर 4 धावांवरच तंबूत परतले होते. नंतर चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या संजू सॅमसन (Sanju Samson) याने डाव सांभाळत 32 चेंडूत 60 धावा चोपल्या आणि संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले. सॅमसन बाद झाल्यानंतर शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) याने मोर्चा सांभाळला. त्याने 26 चेंडूत नाबाद 56 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.
सामन्यानंतर आर अश्विन, संजू सॅमसन आणि संघाच्या फिटनेस प्रशिक्षक एकत्र व्हिडिओ बनवत असतात. त्यावेळी अश्विन हेटमायरलाही यामध्ये सामील होण्यास सांगतात. त्यानंतर हेटमायर म्हणतो की, “माझे नाव सिमरन हेटमायर आहे.” त्यानंतर अश्विन हेटमायरला कोंजम नल्ला बोलण्यास सांगतो. हा मजेशीर व्हिडिओ राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये “द बॉयज आर बॅक,” असे लिहिले आहे.
खरं तर, 26 वर्षीय हेटमायरला राजस्थानने आयपीएल 2023च्या मेगा लिलावात 8.5 कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले होते. हेटमायर राजस्थानकडून दुसरा हंगाम खेळत आहे. सध्याच्या हंगामात तो तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने 5 सामन्यात 183च्या सरासरीने 183 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 अर्धशतकाचाही समावेश आहे. हेटमायरने या धावा तब्बल 184.85च्या स्ट्राईक रेटने चोपल्या आहेत. आता आगामी सामन्यांमध्येही संघाला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. (power hitter shimron hetmyer fun interaction with teammates after match winning knock vs gt ipl 2023 )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गांगुली-विराट नाराजीचा ड्रामा वाढला, आता कोहलीने उचलले टोकाचे पाऊल
‘तुझ्यापुढे राशिद, मुरलीधरनसारखे गोलंदाजही…’, सॅमसनच्या तडाखेबंद खेळीवर हेड कोचचे लक्षवेधी वक्तव्य






