पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रविवारी (4 ऑगस्ट) ग्रेट ब्रिटनविरुद्ध खेळल्या गेलेल्या हॉकीच्या उपांत्यपूर्व सामन्यातील शानदार विजयानंतर जर कोणता खेळाडू सर्वाधिक चर्चेत असेल, तर तो आहे भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेश. श्रीजेशनं या सामन्यात अप्रतिम कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली. सामना संपल्यानंतर श्रीजेश भावूक दिसला. भारतीय संघानं हा सामना पेनॉल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा जिंकला. 36 वर्षीय श्रीजेशचं हे शेवटचं ऑलिम्पिक आहे. त्यानं आधीच निवृत्ती जाहीर केली असून तो प्रत्येक सामन्यात आपलं सर्वस्व देत आहे.
उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकल्यानंतर श्रीजेश म्हणाला, “मी स्वतःला सांगितलं की हा माझा शेवटचा सामना असू शकतो. परंतु जर मी गोल वाचवला तर मला आणखी दोन सामने खेळायला मिळतील. हा सामना जिंकून मला खूप आनंद झाला आहे.”
निर्धारित 60 मिनिटांत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत राहिल्यानंतर पेनॉल्टी शूटआऊट खेळण्यात आला, ज्यामध्ये श्रीजेश अतुलनीय सेव्ह करत संघाच्या विजयाचा नायक ठरला. सोशल मीडियावर भारतीय संघाच्या या उत्कृष्ट कामगिरीनं चाहते खूपच खूश आहेत. भारताच्या विजयानंतर गोलकीपर पीआर श्रीजेश आणि त्याच्या सहकाऱ्यांना सोशल मीडियावर भरभरून प्रेम मिळत आहे.
भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगनं तर ग्रेट ब्रिटनकडून ली मॉर्टननं गोल केले. सामना बरोबरीत सुटल्यानंतर शूटआऊट खेळण्यात
आला. ब्रिटननं पहिला शॉट मारला, जो यशस्वी झाला. त्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगनं गोल करत स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला. ब्रिटनचा दुसरा प्रयत्नही यशस्वी झाला. पण भारतही मागे राहणारा नव्हता. सुखजीतनं गोल करून भारताला 2-2 अशी बरोबरी मिळवून दिली.
ब्रिटनचे उर्वरित दोन प्रयत्न निष्फळ गेले. तर भारतानं पुढील दोन्ही प्रयत्नांत गोल मारून 4-2 असा विजय मिळवला. 1972 म्युनिक ऑलिम्पिकनंतर भारतानं सलग दोन ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हेही वाचा –
इतिहास घडला! भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एंट्री, पेनल्टी शूटआऊटमध्ये मिळवला शानदार विजय
रेड कार्ड, मैदानावर 10 खेळाडू; तरीही हार मानली नाही! ‘ग्रेट वॉल’ श्रीजेशचा पेनॉल्टी शूटआऊटमध्ये पराक्रम
सेमीफायनलमध्ये लक्ष्य सेन पराभूत, आता कांस्य पदकासाठी झुंज देणार