---Advertisement---

बाबर बनलाय श्रीलंकन गोलंदाजाचा बकरा! फिरकीच्या तालावर अक्षरशः नाचतो पाकिस्तानी कर्णधार

On: सोमवार, जुलै 17, 2023 4:31 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील गाले मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्याला रविवारपासून (दि. 16 जुलै) सुरुवात झाली. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी श्रीलंका संघाने आपली पकड मजबूत केली आहे. त्याचवेळी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मात्र, त्याला बाद करताना श्रीलंकेचा फिरकीपटू प्रभात जयसूर्या याने एक मोठा विक्रम नोंदवला.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव 312 धावांवर आटोपला. धनंजय डी सिल्वा याच्या शतकामुळे श्रीलंकेने ही मजल मारली. त्यानंतर पाकिस्तानचा निम्मा संघ 200 धावांच्या आतमध्येच तंबूत परतला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. मात्र, 16 चेंडूंचा सामना करताना केवळ तेरा धावांवर तो जयसूर्या याच्या गोलंदाजीवर सदिरा समरविक्रमा याच्या हाती झेल देत बाद झाला. विशेष म्हणजे जयसूर्या याने त्याला कसोटीमध्ये आत्तापर्यंत चौथ्यांदा बाद केले आहे.

हे दोन्ही खेळाडू आतापर्यंत पाच डावांमध्ये एकमेकांसमोर आले असून, जयसूर्या याने बाबरला चार वेळा तंबूचा रस्ता दाखवला. दुसरीकडे बाबरने 35.75 च्या सरासरीने 143 धावा काढल्या आहेत. असे असले तरी या लढाईत जयसूर्या याचेच पारडे जड दिसून येते.

या सामन्याचा विचार केल्यास, श्रीलंकेने डी सिल्वा याच्या 122 व अनुभवी एंजलो मॅथ्यूज याच्या 64 धावांमुळे 312 पर्यंत मजल मारली. पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदी, नसीम खान व अब्रार अहमद यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा पाकिस्तानने 5 बाद 173 धावा केल्या असून, सौद शकील अर्धशतक झळकावून नाबाद आहे.

(Prabhat Jayasuriya Fourth Time Dismissed Pakistan Skipper Babar Azam In Test)

 

महत्वाच्या बातम्या-
विंडीज दौऱ्यानंतर द्रविड अँड कंपनीला मिळणार ब्रेक, प्रशिक्षकपदाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर?
‘मी पुढील 10-12 वर्षे कार्लोसचं…’, 20व्या वर्षी विम्बल्डनचा किताब जिंकणाऱ्या अल्कारेझचा फॅन बनला सचिन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---