---Advertisement---

पृथ्वी शॉबरोबर जोडलं जातंय प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव; जाणून घ्या कोण आहे ‘ही’ अभिनेत्री

On: गुरूवार, मार्च 18, 2021 2:58 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉला मालिकेतील पुढील सामन्यांमध्ये खेळायची संधी मिळाली नव्हती. पण त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचे नेतृत्व करत त्याने मुंबई संघाला चौथे जेतेपद मिळवून दिले आहे. यासोबतच त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या या हंगामात तब्बल ८२७ धावा केल्या आहेत. यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. यासोबतच तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचे नाव एका प्रसिद्ध अभिनेत्री सोबत जोडले जात आहे.

आयपीएल २०२० स्पर्धेपासूनच पृथ्वी शॉ हा एका अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याचे म्हटले जात होते. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून प्राची सिंग आहे. प्राची सिंग आणि पृथ्वी शॉ हे दोघेही इंस्टाग्रामवर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना अनेकदा पाहायला मिळाले आहे. तसेच पृथ्वी शॉच्या वाढदिवसाच्या वेळी प्रीतीने त्याचे फोटो देखील आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले होते.

आयपीएल २०२० स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्यात आली होती. या स्पर्धेच्या वेळी देखील पृथ्वीने आपल्या कोचिंग स्टाफ सोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यावर प्राचीने “हाहाहा, मला या हसण्याची खूप आठवण येत होती. क्युटी, आधीपेक्षा खूप जास्त.” अशी कमेंट केली होती. ही कमेंट पाहून चाहत्यांनी अंदाज लावायला सुरुवात केली आहे की हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आहे.

कोण आहे प्राची सिंग

प्राची सिंह ही देखील अभिनय क्षेत्रात नवीनच आहे. तिने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात कलर्स टिव्ही शोमध्ये येणाऱ्या ‘उडान’ या मालिकेतून केली होती. तिने या मालिकेत वांशिका शर्माची भूमिका साकारली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

इरफानने पहिल्या षटकात लुटल्या खूप धावा, मग सचिनच्या ‘त्या’ शब्दांनी मिळाली प्रेरणा अन्…

‘हे’ पाच खेळाडू गमावू शकतात आयपीएलच्या पहिल्या आठवड्यातील सामने, जाणून घ्या कारण

टी२० विश्वचषकासाठी भारताची जय्यत तयारी, इंग्लंडनंतर ‘या’ संघांविरुद्ध खेळणार टी२० मालिका 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---