---Advertisement---

१८व्या आशियाई स्पर्धेच्या सराव शिबीरासाठी हिमाचल प्रदेशच्या ७ खेळाडूंची निवड

On: शनिवार, मार्च 10, 2018 12:12 PM
---Advertisement---

जकार्ता येथे होणाऱ्या १८व्या आशियाई स्पर्धेच्या सराव शिबीरासाठी हिमाचल प्रदेशच्या खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हे सराव शिबीर १५ मार्च २०१८ ते १४ एप्रिल २०१८ या काळात होणार आहे. 

पुरूष खेळांडूंचे सराव शिबीर सोनीपत, हरियाणा येथे तर महिला खेळाडूंचे सराव शिबीर गांधीनगर, गुजरात येथे होणार आहे. 

पहिल्यांदाच हिमाचल प्रदेशचे खेळाडू एवढ्या मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. यात ५ महिला आणि २ पुरुष खेळाडूंचा  समावेश आहे. 

या सराव शिबीरात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची जकार्ता येथे होणाऱ्या १८व्या आशियाई स्पर्धेसाठी निवड होणार आहे. 

प्रियांका नेगी, कविता, निधी शर्मा, ज्योती, ललिता ठाकूर या महिला खेळाडूंचा तर अजय ठाकूर आणि विशाल भारद्वाज यांचा समावेश करण्यात आला आहे.

१८वी आशियाई स्पर्धा १८ आॅगस्ट २०१८ ते २ सप्टेंबर २०१८ रोजी इंडोनेशियातील जकार्ता येथे होणार आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment