चेम्सफोर्ड | २५ ते २७ जुलै या दरम्यान कौंटी क्रिकेट मैदानावर भारत वि. एसेक्स यांच्यात तीन दिवसीय सराव सामना पार पडला.
या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांबरोबर गोलंदाजांनीही समाधनकारक कामगिरी करत सामना अनिर्णित राखला.
तसेच आपण इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने ६ बाद ३२२ धावांमध्ये अवघ्या ७३ धावांची भर घालून ९ बाद ३९५ वर डाव घोषित केला होता.
त्यानंतर फलंदाजीस आलेल्या एसेक्स कौंटी संघाने दुसऱ्या दिवशी ५ बाद २३७ धावा केल्या होत्या.
एसेक्स कौंटी संघाने तिसऱ्या दिवशी आपल्या दुसऱ्या दिवसाच्या ५ बाद २३७ धावांमध्ये ३ गडी गमावत १२२ धावांची भर घालत घोषित केला होता.
एसेक्स पहिल्या डावात ८ बाद ३५९ धावा केल्यामुळे भारताला ३६ धावांची किरकोळ आघाडी मिळाली होती.
पहिल्या डावात भारताकडून गोलंदाजी करताना उमेश यादवने ४ तर इशांत शर्मा ३ बळी मिळवत अप्रतीम कामगिरी केली होती.
तर सामन्याच्या पहिल्या डावात विराट, मुरली विजय, केएल राहुल, दिनेश कार्तिकने आणि हार्दिक पंड्याने अर्धशतके करत भारताची फलंदाजी भक्कम असल्याचे दाखवून दिले होते.
सलामीवीर शिखर धवन पुन्हा एकदा पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही शून्यावर बाद झाला.
तर दुसऱ्या डावात सलामीला आलेल्या केएल राहुलने नाबाद ३६ तर मुंबईकर अजिंक्य रहाणेने नाबाद १९ धावा करत पहिल्या कसोटी सामन्यासाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले.
सामन्याच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी भारताचा दुसरा डाव २ बाद ८९ वर संपला.
संक्षिप्त धावफलक-
भारत- पहिला डाव – ९ बाद ३९५ (घोषित) आणि दुसरा डाव – २१.२ षटकात २ बाद ८९ (लोकेश राहुल नाबाद ३६, चेतेश्वर पुजारा २३, क्विन १-५, वॉल्टर १-३८)
इसेक्स- पहिला डाव – ९४ षटकात ८ बाद ३५९ (घोषित) ( पॉल वॉल्टर ७५, माइकल पेपेर ६८, उमेश यादव ४-३५, इशांत शर्मा ३-५९).
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–“कैसे ना हो गुजारा, जब साथ हो कोहली और पुजारा” गब्बरच्या ट्विटने जिंकली लाखो चाहत्यांची मने
-सराव सामन्यात विराटची बत्ती गुल करणार गोलंदाज तो व्हिडीओ करणार जतन